बोरीवली-दत्तपाडा भुयारी मार्गाची रडकथा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरीवली-दत्तपाडा भुयारी मार्गाची रडकथा
बोरीवली-दत्तपाडा भुयारी मार्गाची रडकथा

बोरीवली-दत्तपाडा भुयारी मार्गाची रडकथा

sakal_logo
By

मालाड, ता. १९ (बातमीदार) ः बोरिवली-दत्तपाडा येथे पूर्व-पश्चिम बाजू जोडणारा भुयारी मार्ग आहे. बोरिवली रेल्वे स्थानकाचे फलाट क्रमांक एक व दोन या भुयारी मार्गांच्या दोन्ही बाजूला आल्यावर या मार्गांचा वापर वाढला आहे. भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या मार्गातून वर्दळ सुरू असते; मात्र येथे पाणी पाझरून चिखल पसरत असल्‍याने प्रवासी त्रस्‍त झाले आहेत.
या भुयारी मार्गाचे बांधकाम उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे बरीच वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या माजी रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांच्या प्रयत्नांतून झाले होते; मात्र सुरुवातीपासूनच या भुयारी मार्गाबद्दल प्रवाशांच्‍या तक्रारी राहिल्या आहेत. प्रारंभी या भुयारी मार्गाच्या छतातून कायम गळती होत असे. त्यामुळे गर्दीच्या वेळी नागरिकांची आंघोळ होत असे. याबाबत सातत्याने तक्रारी होत राहिल्यामुळे अखेर त्याची दुरुस्ती करण्यात आली व छतातून होणारी गळती बऱ्यापैकी नियंत्रणात आली.
मात्र हा त्रास थांबतो न थांबतो तोवर या भुयारी मार्गाच्या पश्चिमेकडील बाजूच्या जिन्याच्या पायऱ्यांमधून पावसाळ्यात पाणी पाझरू लागले आहे. हे पाणी भुयारी मार्गाच्या पश्चिम टोकाला साठून राहते आणि त्या अत्यंत घाणेरड्या चिखलमय पाण्यातून प्रवाशांना वाटचाल करावी लागते. यावर उपाय म्हणून तेथे पाणी उपसण्यासाठी पंप बसवण्यात आला असला तरी बऱ्याच वेळा तो बंदच असतो. वा त्याने पाण्याचा पूर्ण उपसा होत नाही. यावर उपाय म्हणून एका बाजूला लोखंडी चौथरा उभारण्यात आला आहे. त्यामुळे त्या बाजूने पूर्वेस जाणाऱ्या प्रवाशांची समस्या बऱ्यापैकी सुटली आहे; मात्र या चौथऱ्याखालची सफाई कधीच होत नाही. त्यामुळे पाणी पाझरू लागताच चिखल तयार होतो व प्रवाशांच्या चपला-बुटांनी तो पूर्ण सबवेभर पसरतो. त्यामुळे अतिशय गलिच्छ अवस्था या सबवेची झाली असून त्यातूनच प्रवाशांची वाटचाल सुरू असते. त्यामुळे लेप्टोस्पायरोसिससारख्या आजारांना बळी पडण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे.
पायऱ्यांमधून केवळ पाऊस पडत असतानाच पाणी पाझरत नाही, तर पाऊस गेल्यानंतरही बराच काळ पाणी पाझरण्याचा प्रकार सुरू असतो. त्यामुळे पश्चिमेकडील बाजूने खोल चर मारून पाणी पाझरण्याचे कारण शोधून काढायला हवे. नंतर त्या चरीत काँक्रीट आतून तो बंद केल्यास ही गळती थांबण्याची शक्यता आहे.

रोज हजारो प्रवासी या भुयारी मार्गातून प्रवास करीत आहेत; मात्र येथील समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे ना रेल्वेला सुचत आहे, ना महापालिकेला!
- प्रभाकर नारकर, अध्यक्ष, जनता दल (से.), मुंबई

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97537 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..