वाहनचालकांसाठी आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहनचालकांसाठी आरोग्य शिबिर
वाहनचालकांसाठी आरोग्य शिबिर

वाहनचालकांसाठी आरोग्य शिबिर

sakal_logo
By

वडाळा, ता. १९ (बातमीदार) ः मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक ॲण्ड जनरल एम्प्लॉईज युनियन व मुंबई पोर्ट प्राधिकरण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी युनियनच्या अधिपत्याखालील चालक, मालक व तंत्रज्ञ कामगार यांच्‍यासाठी आरोग्य तपासणी आणि कोव्हिड लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. याचे उद्‌घाटन ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल, युनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे कामगार सदस्य दत्ता खेसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जवळपास ६४ कामगार व कुटुंबीयांनी या आरोग्य तपासणी व लसीकरणाचा लाभ घेतला. आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी मुंबई पोर्ट प्राधिकरण रुग्णालयाचे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व सर्व कामगार कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97540 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..