वसुरी गावाजवळ बसचा अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसुरी गावाजवळ बसचा अपघात
वसुरी गावाजवळ बसचा अपघात

वसुरी गावाजवळ बसचा अपघात

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १९ (बातमीदार) : विक्रमगड-वाडा मार्गावर वसुरी गावाजळील तीव्र वळणावर सोमवारी सकाळी एसटी बस झाडाला धडकली. या अपघातात बसमधील चार ते पाच प्रवाशी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना वाडा येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
डहाणूवरून येणारी डहाणू-सातारा ही बस वसुरी गावाजवळ असलेल्या वळणावर आली असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे ही बस झाडाला धडकली. या अपघातात बसमध्ये प्रवास करत असलेले चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या जखमींना वाडा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. या बसमध्ये अंदाजे ३५-४० प्रवासी प्रवास करत होते, अशी माहिती येथील प्रत्यक्षदर्शींनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97543 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..