लावणीचा ठसका, गरब्याची धूम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लावणीचा ठसका, गरब्याची धूम
लावणीचा ठसका, गरब्याची धूम

लावणीचा ठसका, गरब्याची धूम

sakal_logo
By

वसई, ता. १९ (बातमीदार) : नवरात्रोत्सव जवळ येऊ लागला असतानाच विरार येथील विवा महाविद्यालयात गरब्याची धूम, लावणीचा ठसका पाहायला मिळाला. महाविद्यालयात आयोजित केलेल्या नृत्य स्पर्धेला उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली.
यंग स्टार ट्रस्टचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून व समन्वयक अजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समूह व एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी एकूण ५४ संघांनी सहभाग घेत एकापेक्षा एक नृत्याविष्कार सादर केले. लावणी, सिनेमा गीते, गरबा, मारवाडी गीते, लोकगीते, कोळीगीतांनी चांगलीच रंगत आणली व उपस्थितांची मने जिंकली. मराठी, मारवाडी, गुजराती, कन्नड भाषेतील गाण्यांवरदेखील नृत्य करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण भारतातील विविध भाषिक एकाच व्यासपीठावर असल्याचे चित्र दिसून आले. १८ ते ५५ वर्षे वयातील कलाकारांनी सहभाग दर्शवला. माजी नगरसेविका व कवयित्री सुरेखा कुरकुरे, ज्योती राऊत, सीमा काळे यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मिलिंद पोंक्षे, मुग्धा लेले, भूषण चुरी, तानाजी पाटील यांनी मेहनत घेतली.
-----------------------------------
विद्यार्थी व नागरिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी यंग स्टार्सतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून नृत्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध भाषिक नागरिकांनी यात सहभाग घेऊन आपल्या कलेची चुणूक दाखवली.
- अजीव पाटील, समन्वयक, यंग स्टार ट्रस्ट
------------------------------------
विजेते स्पर्धक
एकेरी नृत्यात प्रथम- संयुक्ता शेट्टी (शंकर तांडव), द्वितीय- मनीषा भोईर (अरे जारे हट नटखट), तृतीय- तांबे. उत्तेजनार्थ- सृष्टी पालक व भारती (वाजले की बारा) यांनी पारितोषिके पटकावली; तर समूह नृत्य स्पर्धेत प्रथम- चैतन्य सखी ग्रुप, द्वितीय- दिल दोस्ती, तृतीय- आस्तित्व संघ व उत्तेजनार्थ- स्वरा ग्रुप विजेते ठरले.
---------------------
वसई : नृत्य स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97549 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..