बिल्डिंगच्या तिसऱ्या माळ्यावरून खाली पडल्याने ४५ वर्षीय इसम जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिल्डिंगच्या तिसऱ्या माळ्यावरून खाली पडल्याने ४५ वर्षीय इसम जखमी
बिल्डिंगच्या तिसऱ्या माळ्यावरून खाली पडल्याने ४५ वर्षीय इसम जखमी

बिल्डिंगच्या तिसऱ्या माळ्यावरून खाली पडल्याने ४५ वर्षीय इसम जखमी

sakal_logo
By

तिसऱ्या मजल्यावरून पडून एक जण जखमी
नवीन पनवेल (वार्ताहर)ः लिफ्टने वाळूची वाहतूक करताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने ४५ वर्षीय व्यक्ती जखमी झाला आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल आहे. भानघर येथील एका गृहप्रकल्पाच्या साइटवर बिगारीचे काम करणारा तुलसी माहतो लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर वाळू आणण्याचे काम करत होता. याच वेळी बिल्डिंगच्या बाहेर असलेली बांबूची मचान अचानक तुटल्याने तुलसी माहतो हा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला आहे. याप्रकरणी कामगाराच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्याने चौघांविरोधात गुन्हा दाखल आहे.
---------------------------------------
कामगाराला सुपरवायझरची मारहाण
नवीन पनवेल (वार्ताहर) ः कामावर उशिरा आल्याचा राग आल्याने २१ वर्षीय तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार तळोजा परिसरात घडला आहे. या प्रकरणी तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. नितळस येथील तुषार भोपी हा महावीर एक्झॉस्टिक बिल्डिंग न्यू कन्स्ट्रक्शन रोहिंजण येथे काम करतो. या वेळी कामावर पोहोचण्यास विलंब झाल्याने तुषारला सुपरवायझर सूरज पुजारीने मारहाण केली होती.
------------------------------------------------
दुकानाबाहेरील जनरेटरची चोरी
नवीन पनवेल (वार्ताहर) ः पनवेलच्या जुना ठाणा नाका येथे धीरूभाई एंटरप्राइजेस नावाचे झेरॉक्स सेंटर आहे. या दुकानाच्या बाहेर असलेला जनरेटर चोरट्यांनी चोरून नेला आहे. १६ सप्टेंबर रोजी हा प्रकार उघड झाल्यानंतर याप्रकरणी अज्ञातांविरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97552 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..