Mumbai : ठाणे पालिका क्षेत्रातील खड्डे बुजविण्यास सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road Work thane
ठाणे पालिका क्षेत्रातील खड्डे बुजविण्यास सुरुवात

Mumbai : ठाणे पालिका क्षेत्रातील खड्डे बुजविण्यास सुरुवात

ठाणे : बाप्पाच्या आगमनापूर्वी पावसाने घेतलेल्या उसंतीमुळे ठाणे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे विघ्न दूर झाल्याचे दिसत होते; मात्र गणेशोत्सवाच्या काळात पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आणि पुन्हा शहराच्या विविध भागांत खड्डे पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शहरात पुन्हा वाहतूक कोंडी होत असल्याने ठाणेकर मेटाकुटीस आले आहेत. त्यातच महापालिका आयुक्तांनीदेखील अधिकाऱ्यांना तात्काळ खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. पावसाने उसंत घेताच ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नऊ प्रभाग समितीअतंर्गत खड्डे बुजाव मोहिमेने वेग घेतला आहे.

सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांसह मुख्य महामार्गावर तसेच उड्डाणपुलांवरदेखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनांची वाट अडवली जात असून वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शहरात वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्‍या आठवड्यात शहरात ४०० हून अधिकचे खड्डे पडल्याचे दिसून आले. शहरात खड्ड्यांची संख्या ही दोन हजाराहून अधिक झाल्याचे दिसून आले. पाऊस आणि खड्डे यामुळे वाहनांचा वेगही मंदावल्याचे दिसून आले. शहराच्या विविध भागांत मागील काही दिवसांपासून वाहतूक कोंडी होत आहे; मात्र आता पावसाने उघडीप घेतल्याने पालिकेच्या माध्यमातून पुन्हा खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

दिवाळीपूर्वी रस्ते सुस्थितीत

महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागाला खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत; तर नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनीदेखील खड्डे बुजवण्याची मोहीम कुठे आहे, कशा पद्धतीने बुजवले जात आहेत, याची माहिती द्यावी. त्याचे फोटो ग्रुपवर पाठवावेत असे आदेश दिले आहेत. सोमवारी सकाळपासून पालिकेच्या त्या ग्रुपवर खड्डे बुजवण्याचे फोटो पडू लागले आहेत. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत ठाणेकरांची खड्ड्यांच्या कोंडीतून सुटका होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी सिमेंट, कोल्ड मिक्स, हॉट मिक्स, डांबरी पद्धतीने खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. आतादेखील ही तात्पुरत्या स्वरूपातील खड्डे बुजवले जात आहेत, परंतु दिवाळीपूर्वी रस्ते चांगल्या स्थितीत होतील असा दावाही पालिकेने केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97562 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..