सलग तीन सत्राच्या घसरणीला ब्रेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सलग तीन सत्राच्या घसरणीला ब्रेक
सलग तीन सत्राच्या घसरणीला ब्रेक

सलग तीन सत्राच्या घसरणीला ब्रेक

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : सलग तीन सत्रांत भांडवली बाजारामध्ये घसरण झाल्यानंतर सोमवारी तेजी दिसून आली. बँकिंग, एफएमसीजी, वाहन क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात खरेदी झाल्याने बीएसईचा सेन्सेक्स ३०० अंशांनी वधारत ५९,१४१ वर; तर एनएसईचा निफ्टी ९१ अंशाने मजबूत होत १७,६२२ वर बंद झाला. बाजारात सुरुवातीला घसरण झाली होती; मात्र गुंतवणूकदारांकडून खरेदी वाढल्याने निर्देशांक तेजीत बंद झाले.

सेन्सेक्समध्ये महिंद्रा ॲण्ड महिंद्राचा समभाग सर्वाधिक ३.५ टक्के वधारला; तर बजाज फायनान्स, एसबीआय, नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलीव्हर, बजाज फिनसर्व्ह आणि एचडीएफसी कंपन्यांमध्ये तेजी आली होती. टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रीड, एनटीपीसी, एशियन पेन्ट्‍स, एल ॲण्ड टी आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपन्यांच्या समभागात २.५० टक्क्यांपर्यंत घसरण झाली. सेन्सेक्समधील ३० पैकी २२ समभाग हिरव्या रंगाने बंद झाले.

अमेरिकेची फेडरल बँक बुधवारी (ता. २१) पतधोरण जाहीर करणार असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात चढ-उतार दिसून येत आहेत; मात्र अपेक्षेपेक्षा जास्त महागाई राहण्याचा अंदाज आहे. अमेरिकेत व्याजदरात वाढ होण्याची शक्यता असल्याने विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय समभागातून गुंतवणूक काढत आहेत; मात्र हा ट्रेण्ड अल्पकालावधीसाठी राहण्याची अपेक्षा असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे प्रमुख संशोधक विनोद नायर यांनी सांगितले. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेत ७५ आणि इंग्लडमध्ये ५० बेसिक पॉइंट्‍सने वाढ होण्याचा अंदाज आहे.

बीएसईचा मिडकॅप ०.१६ आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.१७ टक्क्यांनी कमजोर झाला; मात्र एफएमसीजी (०.९८ टक्के), वाहन (०.७८), अर्थसेवा (०.५८), ऊर्जा निर्देशांक ०.३३ टक्क्यांनी वधारले. आशियातील बाजारात सेऊल, शांघाई आणि हाँगकाँगमध्ये घसरण नोंदवण्यात आली होती.

रुपया, ब्रेन्ट क्रूड ऑईलमध्ये घसरण
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या दरामध्ये किंचित वाढ झाली होती; मात्र अखेर दोन पैशांनी कमजोर होत ७९.८० वर चलन बाजार बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेन्ट क्रूड ऑईल १.३७ टक्क्यांनी घसरण होत ९०.१० डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97577 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..