ज्वेलर्सचे दुकान फोडुन ४ लाखांच्या चांदीची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्वेलर्सचे दुकान फोडुन ४ लाखांच्या चांदीची चोरी
ज्वेलर्सचे दुकान फोडुन ४ लाखांच्या चांदीची चोरी

ज्वेलर्सचे दुकान फोडुन ४ लाखांच्या चांदीची चोरी

sakal_logo
By

कामोठे, ता. १९ (बातमीदार) : कामोठे सेक्टर-११ मध्ये वसंत बहार या इमारतीच्या एका गाळ्यामध्ये लक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान फोडून अज्ञात व्यक्तींनी सुमारे आठ किलो वजनाचा चार लाखांपेक्षा जास्त किमतीचा चांदीचा मुद्देमाल चोरी केला. या घटनेनंतर कामोठे पोलिस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

कामोठे सेक्टर ११ मध्ये वसंत बहार इमारतीत ९ क्रमांकाच्या गाळ्यामध्ये लक्ष्मी ज्वेलर्स दुकान आहे. मागील सातआठ दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी मागील गाळ्यात चायनीज खाद्यपदार्थ विक्रीचे दुकान सुरू केले होते; मात्र गाळाधारकाशी भाडेकरार केला नसल्याची माहिती पोलिस चौकशीत उघड झाली आहे. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे लक्ष्मी ज्वेलर्सच्या कामगारांनी दुकान उघडल्यावर दुकानात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेचे वृत्त कळताच कामोठेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता जाधव, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. अज्ञात चोरट्यांनी दोन्ही दुकानांच्या मधील भिंत फोडून ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश करून दुकानातील सुमारे चार लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97579 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..