बिनापदवी वकिली करणारी ७२ वर्षीय महिला गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिनापदवी वकिली करणारी ७२ वर्षीय महिला गजाआड
बिनापदवी वकिली करणारी ७२ वर्षीय महिला गजाआड

बिनापदवी वकिली करणारी ७२ वर्षीय महिला गजाआड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसी पोलिसांनी शनिवारी एका ७२ वर्षीय महिलेला कायद्याची पदवी नसताना बेकायदा वकिलीचा व्यवसाय केल्याप्रकरणी अटक केली. मोरदेकाई रेबेका जौब ऊर्फ ​मंदाकिनी काशिनाथ सोहिनी, असे या महिलेचे नाव असून आरोपी महिला पाली हिल येथील रहिवासी आहे.
आवश्यक परवाना कार्ड नसताना वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात सात वर्षे वकिली केल्याचा आरोप महिलेवर आहे. फसवणूक, खोटारडेपणा आणि तोतयागिरी केल्याप्रकरणी बीकेसी पोलिस ठाण्यात या वर्षी ९ जून रोजी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रारदार ४४ वर्षीय अकबर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांना कळले, की ती कौटुंबिक न्यायालयात कोणत्याही परवाना किंवा पदवीशिवाय वकालतनामा दाखल करत होती. या प्रकरणात तक्रारदार अकबर खान हे १० वर्षे रिक्षाचालक म्हणून काम करीत होते. त्याबरोबरच त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले असून आता ते व्यवसायाने वकील आहेत. ते म्हणाले, या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मी पोलिस, बार कौन्सिल आणि कौटुंबिक न्यायालयात यासंदर्भात लेखी तक्रार केली. महाराष्ट्र आणि गोव्याच्या बार कौन्सिलच्या सचिवांनीही बीकेसी पोलिस ठाण्याला लिहिलेल्या पत्राला उत्तर दिले आहे, की त्यांच्याकडे वकील म्हणून या महिलेची नावनोंदणी नाही.
...
तपासात सहकार्य नाही!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिला २०१५ मध्ये किमान तीन वेळा आणि २०२१ मध्ये दोनदा कौटुंबिक न्यायालयात वकील म्हणून काही खटल्यांत युक्तिवादासाठी हजर झाली होती. दुसऱ्याच्या नावावर असलेला परवाना महिला आरोपी वापरत असल्याची माहिती तपासात पोलिसांना मिळाली. महिलेने संबंधित कायद्याची पदवी किंवा परवाना कार्ड पोलिसांकडे सादर केले नाही, तसेच पोलिस तपासात सहकार्य केले नाही. आरोपीचा अटकपूर्व जामीनअर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने महिलेला २० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97602 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..