महिला एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती येणार स्टेअरिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती येणार स्टेअरिंग
महिला एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती येणार स्टेअरिंग

महिला एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती येणार स्टेअरिंग

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या काळात मोठा गाजावाजा करत महिलांच्या हाती एसटीचे स्टेअरिंग देण्याची घोषणा करण्यात आली होती; प्रत्यक्षात या महिलांचे प्रशिक्षण पूर्ण होऊनही आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांना अद्याप नियुक्तीची प्रतीक्षा करावी लागत होती; मात्र निवड झालेल्या ८० महिला सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यापुढे नियुक्तीच्या मागणीसाठी जमा झाल्या होत्या. सह्याद्री अतिथीगृहावर या महिलांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन दोन दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
महिलांच्या हाती एसटी बसचे स्टेअरिंग देण्यासाठी २०१९ मध्ये सरळ सेवा भरती घेण्यात आली होती. त्यामध्ये पात्र महिला उमेदवारांना ३०० दिवसांचे वाहन चालवण्याचे प्रशिक्षण पूर्ण करायचे होते. ते प्रशिक्षण पूर्ण झाले; मात्र अद्याप नियुक्ती मिळत नसल्याने या महिलांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अनेक महिलांनी आपले खासगी काम, नोकरी सोडल्याने कुटुंबातील आरोग्य, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने पात्र महिला उमेदवारांकडून संताप व्यक्त केला जात आहे. परिणामी, सोमवारी यातील सुमारे ८० पात्र महिला उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापुढे एकत्र येऊन थेट मुख्यमंत्र्यांकडेच नियुक्तीची मागणी केल्यानंतर अखेर येत्या दोन दिवसांमध्ये यासंदर्भातील आढावा घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शिंदे यांनी महिला उमेदवारांना दिले आहे.
...
अशा आहेत मागण्या
- विभागीय स्तरावर वाहतूक निरीक्षकांच्या वाहनांवर नियुक्ती मिळावी.
- चालक तथा वाहक दोन्ही परवाने असल्याने वाहक म्हणून नियुक्ती द्यावी.
- १३७ पात्र उमेदवारांना नियुक्ती देऊन न्याय द्यावा.
...
महिलांच्या नियुक्तीसंदर्भात दोन दिवसांमध्ये आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्याची मुख्यमंत्री कार्यालयाकडून सूचना आहे. त्यामुळे महिलांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा आहे.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
...
मुख्यमंत्र्यांनी नियुक्तीसंदर्भातील मागण्या ऐकूण घेत एसटी महामंडळाच्या प्रशासनाला दोन दिवसांत बैठक घेण्याची सूचना दिली आहे. सर्व महिलांची आर्थिक परिस्थिती वाईट असल्याने लवकरात लवकर नियुक्ती मिळावी.
- माधवी साळवे, उमेदवार महिला, नाशिक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97608 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..