कल्याण माळशेज घाट राष्ट्रीय महामार्गावर पुलावर बांधलेला संरक्षक कठडा तुटल्याने वाहन चालकांचा दगडावर भरवसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण माळशेज घाट राष्ट्रीय महामार्गावर पुलावर बांधलेला संरक्षक कठडा तुटल्याने वाहन चालकांचा दगडावर भरवसा
कल्याण माळशेज घाट राष्ट्रीय महामार्गावर पुलावर बांधलेला संरक्षक कठडा तुटल्याने वाहन चालकांचा दगडावर भरवसा

कल्याण माळशेज घाट राष्ट्रीय महामार्गावर पुलावर बांधलेला संरक्षक कठडा तुटल्याने वाहन चालकांचा दगडावर भरवसा

sakal_logo
By

मुरबाड, ता. २० (बातमीदार) : कल्याण माळशेज घाट राष्ट्रीय महामार्गावर मुरबाडकडून कल्याण दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील मुरबाडी नदीच्या पुलावर बांधलेला संरक्षक कठडा तुटला आहे. हा कठडा तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी वाहन चालक व प्रवासी करत आहेत
कल्याण माळशेज घाट महामार्गावर मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. हा रस्ता चौपदरी करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. मात्र, ब्रिटिश काळात मुरबाडी नदीवर बांधण्यात आलेला पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने चालकांना सध्या जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे पुलाच्या बाजूला दगड ठेवण्यात आले आहेत. त्याला धडक देऊन वाहने नदीपात्रात कोसळण्याची शक्यता असल्याने या पुलावरील कठड्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
-------------------------------------
कोट
मुरबाड कल्याण रस्त्यावरून रोज शेकडो वाहने प्रवास करत आहेत. मुरबाडी नदीच्या पुलावर जो कठडा तुटला आहे, तेथे अवघड वळण आहे. ते लक्षात येत नाही. या ठिकाणी तातडीने मजबूत संरक्षक कठडा बांधणे आवश्यक आहे.
- किशोर गायकवाड, वाहन चालक
------------------------------------
मुरबाडी नदीवरील पुलाचा कठडा तुटल्याने वाहनांचा अपघात होऊ नये म्हणून तेथे कापडी पट्टी तसेच दगड ठेवलेले आहेत. त्या पुलाचे कठडे बांधण्यासाठी निविदा मंजूर झाली असून, येत्या दोन दिवसांत काम सुरू करण्यात येईल.
- तृप्ती नाग, कार्यकारी अभियंता, कल्याण माळशेज घाट, राष्ट्रीय महामार्ग विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97619 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..