सुधारित विकास आराखड्यानुसार भिवंडी उभारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुधारित विकास आराखड्यानुसार भिवंडी उभारा
सुधारित विकास आराखड्यानुसार भिवंडी उभारा

सुधारित विकास आराखड्यानुसार भिवंडी उभारा

sakal_logo
By

भिवंडी, ता. २० (बातमीदार) : भिवंडी शहराची आगामी २० वर्षांची लोकसंख्या लक्षात घेऊन, सुधारित विकास आराखड्यानुसार विकसित भिवंडी घडविण्याचा प्रयत्न करावा. तसेच शहराच्या विविध भागांचा सर्वांगीण विकास करावा, अशी सूचना केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली.
भिवंडी शहराच्या नियोजित सुधारित आराखड्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी महापालिका मुख्यालयात बैठक घेतली. या वेळी आयुक्त विजयकुमार म्हसाळ, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, नगररचना अधिकारी, शहर अभियंता आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरांप्रमाणेच भिवंडी क्षेत्राचाही विकास होत आहे. भिवंडी शहर हे जुने दाटीवाटीचे शहर अशी ओळख पुसून नवी ओळख निर्माण करण्याची गरज आहे. पॉवरलूम नगरी असलेल्या भिवंडीत आता इतर व्यवसायही सुरू झाले आहेत. त्यानुसार शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे सुधारित विकास आराखड्यानुसार भिवंडी शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावा. वऱ्हाळदेवी तलावाचे सुशोभीकरण, अद्ययावत नाट्यगृह, दर्जेदार वैद्यकीय सुविधांचे हॉस्पिटल, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण उभारण्याला प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर आगामी २० वर्षांची लोकसंख्या विचारात घेऊन नियोजन करावे, अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बैठकीत दिल्या.
नागरिकांच्या गरजा महत्त्‍वाच्‍या
शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी नवीन विकसक शहरात येण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर शहराच्या अर्थव्यवस्थेला आणखी चालना मिळू शकेल. भिवंडी शहराला वेगाने विकसित होणाऱ्या शहराचा नावलौकिक मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. या प्रक्रियेत शहरातील नागरिकांनाही सहभागी करून घ्यावे. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामे आखावीत. त्याचबरोबर त्यांच्या सूचनांना प्राधान्य द्यावे, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97626 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..