घणसोलीत जीवाशी खेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घणसोलीत जीवाशी खेळ
घणसोलीत जीवाशी खेळ

घणसोलीत जीवाशी खेळ

sakal_logo
By

घणसोली, ता. २० (बातमीदार) ः घणसोली गावात असलेल्या विद्युत खाबांवरील तारा अनेक ठिकाणी धोकादायक अवस्थेत आहेत. याशिवाय दिवसातून सात ते आठ तास विद्युतपुरवठादेखील खंडित होत असल्याने महावितरणच्या या कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे.
घणसोली गावात विद्युत वितरणाची व्यवस्था जीर्ण झाली आहे. अनेक भागांत लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा असून महावितरणच्या दुर्लक्षामुळे मोठा अपघात घडण्याचा धोका आहे. घणसोली गावात सर्वच ठिकाणी वीजवाहिन्यांवरील तारा जोडलेल्या अवस्थेत आहेत; तर काही ठिकाणी धोकादायक स्थितीत लोंबकळणाऱ्या या तारा एखाद्या दुर्घटनेलाही निमित्त ठरण्याची शक्यता आहे. शिवाय जीर्ण झालेल्या या वीज वाहिन्यांमुळे घणसोली गावात दररोज ८ ते ९ तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने अनेकांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर वीजवाहिन्यांच्या दुरुस्ती महावितरणने करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
-----------------------------------------------------
गेल्या अनेक दिवसांपासून घणसोली गावात ठिकठिकाणी विद्युतपुरवठा करणाऱ्या तारा धोकादायक अवस्थेत आहेत. या तारांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
- प्राजक्ता कांबळे, नागरिक
----------------------------------------
या तारा अनधिकृत बांधकाम क्षेत्रात असल्याने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे. तसेच घणसोली जीर्ण झालेल्या वाहिन्या दुरुस्तीबाबत महावितरण प्रयत्नशील आहे.
- अभिजित बोधनकर, अभियंता, महावितरण

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97637 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..