पदपथांवर कचऱ्याचे ढिगारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदपथांवर कचऱ्याचे ढिगारे
पदपथांवर कचऱ्याचे ढिगारे

पदपथांवर कचऱ्याचे ढिगारे

sakal_logo
By

घणसोली, ता. २० (बातमीदार) ः घणसोली, सेक्टर ४ येथील चौकात महापालिकेच्या वतीने सुका कचरा- ओला कचरा वर्गीकरणासाठी लिटल बिन्सची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, बिन्स काही लोकांनी तोडून टाकल्याने रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने अस्वच्छेसोबतच दुर्गंधीचा सामना घणसोलीकरांना सहन करावा लागत आहे.
शहर स्वच्छतेच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेने विविध उपक्रमांद्वारे स्वच्छ सर्वेक्षणात चांगली कामगिरी केली आहे. तसेच शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने अजूनही महापालिका कार्यरत आहे. मात्र, बेशिस्त नागरिकांमुळे या प्रयत्नांवर पाणी फेरले जात आहे. घणसोली, सेक्टर ४ येथील आरोग्य केंद्राच्या विरुद्ध दिशेला असलेल्या पदपथावर महापालिकेच्या वतीने कचरा टाकण्यासाठी लिटिल बिन्स बसवण्यात आले होते; मात्र हे बिन्स अज्ञातांकडून तोडण्यात आल्याने घरातील ओला आणि सुका कचरा पदपथावरच टाकण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
------------------------------------------
बेशिस्त नागरिकांवर कारवाईचा अभाव
महापालिकेच्या वतीने घंटा गाडीच्या माध्यमातून शहरात कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे; मात्र त्याला गांभीर्याने घेतले जात नसल्याने रस्त्यांवर घरातील शिळे अन्न, कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून बेशिस्त नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत.
---------------------------------------------------
घणसोली, सेक्टर ४ येथील चौकात स्वच्छता विभागामार्फत घंटा गाडीच्या माध्यमातून नागरिकांना वारंवार इशारा देण्यात येतो. मात्र, तरीही नागरिक या ठिकाणी कचरा टाकतात.
- संजय पाटील, स्वच्छता निरीक्षक, घणसोली
---------------------------------------------
घणसोली, सेक्टर ४ येथील पदपथावर मोठ्या प्रमाणात शिळे अन्न आणि इतर कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे परिसरातील सोसायट्यांमध्ये दुर्गंधी पसरली असून या रस्त्याने जाणेदेखील नकोसे वाटते.
- लक्ष्मी दळवी, नागरिक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97643 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..