खारघर वसाहतीमधील कोंडी फुटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघर वसाहतीमधील कोंडी फुटणार
खारघर वसाहतीमधील कोंडी फुटणार

खारघर वसाहतीमधील कोंडी फुटणार

sakal_logo
By

खारघर, ता. २० (बातमीदार) : खारघर वसाहतीमध्ये होणाऱ्या ‘बेशिस्त वाहतुकीकडे कानाडोळा’ अशा आशयाची बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत शहरातील वाहतूक कोंडीविषयी शासनाच्या प्रचलित कायदे, नियम, धोरणानुसार उचित कारवाई करून त्यांचा अहवाल कोकण भवन कार्यालयातील मुख्यंमत्री सचिवालय कक्षाकडे विनाविलंब पाठविण्यात यावा, असे पत्र कोकण विभागाचे उपायुक्त तथा पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष अधिकारी मकरंद देशमुख यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तांना पाठवले आहे.
खारघरमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असून कारवाईबाबत पोलिस उदासीन असल्याचा प्रकार ‘सकाळ’च्या माध्यमातून मांडण्यात आला होता. त्यानंतर खारघरमधील भाजपचे शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल आणि उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पुरषोत्तम कराड तसेच खारघर शाखेचे वाहतूक अधिकारी योगेश गावडे यांची भेट घेतली होती. तसेच कोकण भवन कार्यालयातील मुख्यमंत्र्यांच्या सचिवालय कक्षाकडे पत्र पाठवून खारघरमधील वाहतूक कोंडी सोडवावी असे पत्र दिले होते. या पत्राची दखल घेत कोकण विभागाचे उपायुक्त तथा मुख्यमंत्री सचिवालय कक्ष अधिकारी मकरंद देशमुख यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून खारघर वसाहतीमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीविषयी उचित कारवाईचे आदेश दिले आहेत.
----------------------------------------------
येथे वाहतूक कोंडीची समस्या
खारघर शहरातील हिरानंदानी येथील प्रवेश मार्ग, सेक्टर सहा बँक आणि रिलायन्ससमोरील आणि बेलपाडा ते उत्सव चौकाकडे जाणारा मार्ग, सेक्टर १२ आणि डेली बाजारकडे जाणारा रस्ता तसेच सेक्टर १२ नवरंग सर्कल आणि सेक्टर २० मासळी मार्केट आणि सेक्टर १५ डी-मार्ट आणि कोपरा पुलावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97644 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..