एसटीच्या ताफ्यात १५० सीएनजी बसची भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीच्या ताफ्यात १५० सीएनजी बसची भरती
एसटीच्या ताफ्यात १५० सीएनजी बसची भरती

एसटीच्या ताफ्यात १५० सीएनजी बसची भरती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागात सद्यस्थितीत ५९ सीएनजी बस धावत असून त्या ताफ्यात आणखी १५० नव्या सीएनजी बस लवकरच दाखल होणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने दाखल होणाऱ्या बससाठी ठाणे जिल्ह्यात आणखी दोन सीएनजी पंपही सुरू होणार असल्याने पंपाची संख्याही तीन होणार आहे. या बसमुळे प्रदूषण निश्चितच कमी होईल, तसेच या बस दसऱ्यानंतर दाखल होतील, असा विश्वास ठाणे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने डिझेलवर धावणाऱ्या एसटी बस बंद करून त्या जागी सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसचा पर्याय पुढे आणला आहे. त्यानुसार सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे; तर ठाणे विभागाच्या ठाणे आगार १-२, कल्याण, विठ्ठलवाडी, मुरबाड, शहापूर आणि बोरिवली या आगारातून दिवसाला ५५० गाड्यांची दररोज राज्यभरात वर्दळ सुरू असते. दिवसाला या गाड्या अंदाजे एक लाख ५८ हजार किलोमीटरचा प्रवास करतात; तर ठाणे विभागातून साधी, निमसाधी, शिवशाही यासारख्या एकूण पाच प्रकारच्या गाड्या मार्गक्रमण करत आहेत. ठाणे विभागात सध्‍यस्थितीत ५९ सीएनजी बस धावत असून त्या बस प्रामुख्याने ठाणे-बोरिवली, ठाणे-भाईंदर, ठाणे-पनवेल आणि ठाणे-भिवंडी या मार्गावर धावत आहेत. सीएनजी बसची संख्या वाढवण्याची मागणी केल्यानंतर १५० बस मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यानुसार त्या बस लवकरच दाखल होणार आहेत. या बस दसऱ्यानंतर टप्प्याटप्याने दाखल होण्याची शक्यता आहे. या बसमध्ये सीएनजी भरण्यासाठी सीएनजी पंप स्टेशनची आवश्यकता असल्याने ठाणे खोपटपाठोपाठ विठ्ठलवाडी येथे पंप सुरू झाला आहे; तर भिवंडी येथे येत्या काही महिन्यांत पंप सुरू होईल. तसेच या बसमध्ये सीएनजी भरल्यानंतर त्या बस ४०० ते ५०० किलोमीटर धाऊ शकणार आहेत. त्यामुळे या बस जास्तीत जास्त जिल्हा पातळीवर चालवल्या जाणार आहेत. तसेच त्या ठाणे-पुणे, ठाणे-अलिबाग आदी मार्गांवर सोडल्या जाणार आहेत. या वाढणाऱ्या बसमुळे ठाणे विभागातील सीएनजी बसची संख्या निश्चितच वाढणार आहे, अशी माहिती संबंधित विभागाने दिली.
..................
कोट :-
१५० सीएनजी बस दसऱ्यानंतर ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने या बस ठाणे जिल्हा पातळीवर सोडल्या जातील. तसेच त्या बस पुणे, रायगड, अहमदनगर यांसारख्या जिल्ह्यात सोडण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.
- विनोदकुमार भालेराव, विभागीय नियंत्रक अधिकारी, ठाणे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97648 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..