खड्डे बुजवा अन्यथा रास्ता रोको करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्डे बुजवा अन्यथा रास्ता रोको करणार
खड्डे बुजवा अन्यथा रास्ता रोको करणार

खड्डे बुजवा अन्यथा रास्ता रोको करणार

sakal_logo
By

कल्याण, ता. २० (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली शहरातील प्रमुख रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्डेमय रस्‍त्‍यांमधून वाहन काढणे जिकिरीचे झाले आहे. त्याचा रिक्षाचालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून आगामी सात दिवसांत शहरातील रस्त्यात पडलेले खड्डे बुजवा; अन्यथा शहरातील नागरिकांना घेऊन चौकाचौकात उभे राहून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा रयत वाहतूक संघटनेने दिला आहे.
रिक्षाचालकांचे आरोग्य धोक्यात
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत कामे सुरू असल्याने रिक्षाचालकांना त्यांची वाहने उभी करण्यासाठी जागेची समस्या आहे. कसेबसे रिक्षात प्रवासी बसले, की दिवसभर वाहतूककोंडीमधून वाट काढत प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी सोडणे जिकिरीचे झाले आहे. दुसरीकडे इंधन दरवाढ, सरकारने भाडेवाढीबाबत निर्णय न घेतल्याने, रिक्षाचालक आर्थिक संकटात सापडला आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत असताना आता शहरात खड्डेमय रस्त्यामुळे रिक्षाचालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सात दिवसांत खड्डे बुजवा
गणेशोत्सवापूर्वी केडीएमसीने रस्त्यावरील खड्डे बुजविले; मात्र पावसाने अनेक ठिकाणी पुन्हा रस्त्यावर खड्डे झाले असून, संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामाच्‍या दर्जावर सवाल केला जात आहे. आम्ही करदाते नागरिक असून मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत असून, आगामी २९ सप्टेंबर म्हणजे सात दिवसांत शहरातील रस्त्यातील खड्डे न बुजविल्यास चौकाचौकात उभे राहून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा रयत वाहतूक संघटना अध्यक्ष राहुल वारे यांनी दिला आहे.

कोट
गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविणे आणि डांबरीकरण केले होते. मात्र, मुसळधार पावसाने पुन्हा जैसे थे परिस्थिती असून सतत पडत असलेल्‍या पावसात डांबरीकरण करणे शक्य नसले, तरी रस्त्यात पडत असलेल्या खड्ड्यात खडी, पेव्हर ब्लॉक, माती टाकून तात्पुरती डागडुजी करण्‍यात येत आहे. पाऊस थांबताच पुन्हा मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची कामे हाती घेतली जाईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97649 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..