शक्य तिथे सेना-काँग्रेसशी युती ः म्हात्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शक्य तिथे सेना-काँग्रेसशी युती ः म्हात्रे
शक्य तिथे सेना-काँग्रेसशी युती ः म्हात्रे

शक्य तिथे सेना-काँग्रेसशी युती ः म्हात्रे

sakal_logo
By

खर्डी, ता. २० (बातमीदार) ः शहापूर तालुक्यात ७९ ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता यायला पाहिजे. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी आपसातील हेवेदावे विसरून कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश म्हात्रे यांनी केले. येथील शेट्टे सभागृहात राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दशरथ तिवरे यांनीही बैठकीस संबोधित केले. ज्या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेससोबत आघाडी करणे शक्य आहे, तिथे एकत्रित निवडणूक लढवा, असे तिवरे यांनी सांगितले. निवडणुकांसाठी तांत्रिक बाबी सांभाळण्याकरिता पाच तज्ज्ञ लोकांची समिती नेमून त्यांच्याकडे निवडणुकांची कागदपत्रांची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले; तर आमदार दौलत दरोडा यांनी शिंदे गटाशी युती न करण्याचे आवाहन केले. याला कार्यकर्त्यांनी सहमती दर्शवली. या वेळी आमदार दौलत दरोडा, प्रदेश उपाध्यक्ष दशरथ तिवरे, पशुसंवर्धन सभापती संजय निमसे, महिला जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे, सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष अविनाश थोरात, तालुकाध्यक्ष मनोज विशे, विनायक सापळे, रवी पाटील, भरत घनघाव आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97651 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..