४० वर्षांनंतर वर्गमित्रांची गाठभेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

४० वर्षांनंतर वर्गमित्रांची गाठभेट
४० वर्षांनंतर वर्गमित्रांची गाठभेट

४० वर्षांनंतर वर्गमित्रांची गाठभेट

sakal_logo
By

कासा, ता. २० (बातमीदार) ः येथील भिसे महाविद्यालयात सोमवारी ४० वर्षांपूर्वीच्या वर्गमित्रांचा मेळा भरला. यात साठी पार केलेले ३१ विद्यार्थी त्यांचे शिक्षक आणि त्या काळचे शिपाई यांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. १९८१-८२ ची ही दहावीची बॅच आहे. ज्या शाळेत एकत्र खेळलो, भांडलो तेथील शिक्षक, वर्गमित्र एकत्र आल्याने सर्व जण भावुक झाले होते. बऱ्याच वर्षांनी एकत्र भेटलेल्या सर्वांनी एकमेकांची आस्थेने विचारपूस केली.

ऐंशीच्या दशकातील दहावीच्या या वर्गमित्रांना पुन्हा एकत्र येण्याचे निमित्त ठरले व्हॉट्सॲप ग्रुप. ग्रुपवरच या ३१ वर्गमित्रांनी आपल्या शाळेत जमण्याचा बेत केला. त्यात आपले शिक्षक आणि शिपाई दादांनाही सामील करण्याचा विचार झाला आणि सोमवारी (ता. १९) या वर्गमित्रांचा मित्रमेळा शाळेच्या आवारात भरला. विशेष म्हणजे भिसे महाविद्यालयाचे सध्याचे मुख्याध्यापक भरत ठाकूर हे याच बॅचचे विद्यार्थी आहेत. त्यांनी सर्व वर्गमित्र, शिक्षक, शिपाई दादांचे स्वागत केले. शिक्षकांप्रति आदर व्यक्त केला. याप्रसंगी तत्कालीन मुख्याध्यापक नवनाथ धनू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हे सर्व माजी विद्यार्थी म्हणजे हिरे आहेत, असे धनू म्हणाले.
यातील अनेक जण उच्च पदावर कार्यरत आहेत. धनंजय वनमाळी हे राष्ट्रीय हॉलीबॉलपटू व प्रशिक्षक आहेत. या वनमाळी म्हणाले, खरा विद्यार्थी शाळेतच घडतो. शिक्षक हेच विद्यार्थी घडवणारे शिल्पकार आहेत. ४० वर्षांनी पुन्हा एकदा शाळेत आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. या वेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला मदत देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी माजी मुख्याध्यापक नवनाथ धनू, सुरेश डोईफोडे, नारायण रणखांबे, दामोदर लांडगे, एकनाथ फेगडे, नरेश कुंभारे, श्रवण गावित, पांडुरंग बसवत, विनायक बसवत उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97652 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..