अवजड वाहतूक चालकांना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवजड वाहतूक चालकांना मार्गदर्शन
अवजड वाहतूक चालकांना मार्गदर्शन

अवजड वाहतूक चालकांना मार्गदर्शन

sakal_logo
By

कासा, ता. २० (बातमीदार) ः महामार्ग मदत पोलिस केंद्राकडून अवजड वाहन चालक-मालकांना वाहतूक नियमांच्या पालनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. धानीवली परिसरातील पटेल हॉटेल येथे हा कार्यक्रम पार पडला. पोलिस महासंचालक एन. सरंगल, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, पोलिस उप अधीक्षक मृदुला नाईक यांनी मार्गदर्शन केले.

सध्या महामार्गांवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यात पावसामुळे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी वाहन चालवताना काळजी घेणे गरजेचे आहे. अवजड वाहन महामार्गावरून चालवताना नेहमी आपले वाहन डाव्या बाजूने तिसऱ्या लेनवरूनच चालवावे. महामार्गावर कोठेही अनधिकृतपणे पार्किंग करू नये. पार्किंग हॉटेल, ढाबे येथील मोकळ्या जागेत करावे किंवा काही अडचण असल्यास सर्व्हिस रोडचा वापर करावा. वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करू नये, दारू पिऊन वाहन चालवू नये. चार चाकी वाहन चालवताना सिटबेल्टचा वापर करावा, वाहन चालवताना नेहमी वेगमर्यादेचे पालन करावे, आपले वाहन ताब्यात घेताना ते सुस्थितीत आहे का हे चेक करावे, जेणेकरून चालवताना बंद पडणार नाही. अपघात झाल्यास मदत मिळवण्यासाठी तात्काळ पोलिसांना ११२ नंबरवर तसेच अपघातातील जखमींना उपचारासाठी ॲम्बुलन्सकरिता १०८ नंबरवर कॉल करावा. मार्गदर्शन करताना महामार्ग पोलिस मदत केंद्र चारोटीचे सहायक पोलिस अधिकारी एस. डोंगरे व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97653 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..