‘विवा’ची एकांकिका इप्टा स्पर्धेच्या अंतिम फेरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘विवा’ची एकांकिका इप्टा स्पर्धेच्या अंतिम फेरीत
‘विवा’ची एकांकिका इप्टा स्पर्धेच्या अंतिम फेरीत

‘विवा’ची एकांकिका इप्टा स्पर्धेच्या अंतिम फेरीत

sakal_logo
By

विरार, ता. २० (बातमीदार) ः विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित विवा महाविद्यालयाने पुन्हा एकदा एकांकिका स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’ (इप्टा) हिंदी एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत या महाविद्यालयाने प्रवेश केला आहे. ४९ व्या इप्टा स्पर्धेत विवा महाविद्यालयाची ‘सेल ऑफ सुसाईड’ ही एकांकिका अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे.

या स्पर्धेची अंतिम फेरी २१ सप्टेंबर रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यगृह येथे होणार आहे. सिने कलाकार सुलभा आर्या आणि अंजन श्रीवास्तव यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेची प्राथमिक फेरी १२ ते १४ सप्टेंबर या कालावधीत रवींद्र नाट्यमंदिराच्या मिनी थिएटर येथे पार पडली. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत २७ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यापैकी विवा महाविद्यालयासह इतर पाच महाविद्यालये अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहेत. ‘सेल ऑफ सुसाईड’ ही एकांकिका आत्महत्येसारख्या गंभीर प्रश्नावर भाष्य करते. लेखक दिनेश देवळेकर यांनी या एकांकिकेचे लेखन केले असून महेश सापणे आणि शार्दुल आपटे यांनी दिग्दर्शन केले आहे. विवा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या ओमकार येंडे याने एकांकिकेचे पार्श्वसंगीत केले आहे; तर नेपथ्याची जबाबदारी मानसी जाधव, रूपक मराठे आणि जितू कदम यांनी सांभाळली आहे. या विजयाबाबत विवा महाविद्यालयाचे विश्वस्त, मुख्याध्यापक, सर्व प्राचार्य आणि शिक्षकवर्गाने सर्व विद्यार्थी कलाकार आणि दिग्दर्शकांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97654 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..