महामार्गावर पुन्हा खड्ड्यांत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावर पुन्हा खड्ड्यांत
महामार्गावर पुन्हा खड्ड्यांत

महामार्गावर पुन्हा खड्ड्यांत

sakal_logo
By

मनोर, ता. २० (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पुन्हा मोठ्या संख्येने खड्डे पडले असून खड्ड्यांमधून वाट काढताना वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. महामार्गावरील खड्ड्यांमध्ये वाहने आदळून टायर फुटणे तसेच अवजड वाहनांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर महामार्गावर पडलेले खड्डे महिनाभरापूर्वी बुजवण्यात आले होते, परंतु गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे महामार्गावरील खड्डे जैसे थे झाले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तीन महिन्यांपूर्वी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टोलवसुली आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी दोन वेगवेगळ्या कंत्राटदार कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. देखभाल-दुरुस्तीचे कंत्राट असलेल्या कंपनीकडे साधनसामग्री उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे खड्डे बुजवण्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे.
महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने खानिवडे टोल नाक्यावर आंदोलन करून टोलवसुली बंद पाडली होती. आंदोलनाची दखल घेत कंत्राटदार कंपनीने महामार्गावरील खड्डे बुजवले होते, परंतु आठवडाभरापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे महामार्गावरील खड्ड्यांची स्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे.
खड्ड्यांमध्ये आदळून अवजड ट्रक आणि चारचाकी वाहनांचे टायर फुटण्याच्या घटना घडत आहेत. महामार्गावरील खड्डे बुजवले जात नसल्याने दिवसेंदिवस खड्ड्यांची संख्या वाढली आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. त्यामुळे महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी जोर धरत आहे.
.....

पालघर भागात पाऊस सुरू असल्याने खड्डे भरण्यासाठी विलंब होत आहे. खडी टाकून खड्डे बुजवले जात आहेत. पाऊस थांबल्यानंतर खड्ड्यांच्या ठिकाणची कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल.
- सूरज सिंग, प्रकल्प संचालक, सुरत दहिसर टोल वे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

कंत्राटदाराला नोटीस
महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नेमलेल्या कंपनीमार्फत महामार्गावर पडलेले खड्डे बुजवले जात नसल्याचे निदर्शनास आले आहेत. कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतरही खड्डे बुजवण्यास दिरंगाई आढळल्यास कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. कंत्राटदाराने खड्डे बुजवण्याच्या कामासाठी महामार्ग प्राधिकरणाकडे दोन दिवसांचा वेळ मागितल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97656 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..