प्रशासकीय अनास्थेमुळेच प्रियांकाचा बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासकीय अनास्थेमुळेच प्रियांकाचा बळी
प्रशासकीय अनास्थेमुळेच प्रियांकाचा बळी

प्रशासकीय अनास्थेमुळेच प्रियांकाचा बळी

sakal_logo
By

पनवेल, ता.२०(बातमीदार) : नवीन पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील पथदिवे दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी पथदिवे सुरू करण्याबाबत प्रशासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा करत आहे. पण सिडको आणि महापालिका मात्र एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी झटकत असल्याने या अनास्थेमुळे प्रियांका रावत या महिलेचा बळी गेल्याची संतप्त प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहे.
नवीन पनवेल सेक्टर १५ मध्ये रेल्वे स्टेशनकडून हॉटेल नीलकमलकडे येणाऱ्या रस्त्यावरील पथदिवे दोन महिने बंद आहेत. त्यामुळे स्टेशन परिसरातील रिक्षा आणि बस थांबा परिसरात अंधार पसरलेला आहे. याच अंधाराचा फायदा घेवून गुरुवारी रात्री विहीरघर येथील प्रियंका रावतची पनवेल स्टेशनबाहेर निर्घुण हत्या झाली होती. काळोखामुळे मारेकऱ्यांना पळून जाणे शक्य झाले होते. या प्रकारानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्त्यावरील बंद पथदिवे सुरू करण्याबाबत सिडकोकडे पाठपुरावा केला आहे. पण महापालिकेकडे सेवा हस्तांतर केल्यामुळे ठेकेदाराला काम बंद करायला सांगितल्याचे कारण सिडकोकडून दिले जात आहे. तर दुसरीकडे महापालिका प्रशासन देखील पथदिवे दुरुस्त केले नसल्यामुळे सेवा ताब्यात घेतली नसल्याचे कारण देत आहे. पण दोन्ही प्रशासकीय यंत्रणांमधील या वादामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न मात्र दुर्लक्षित झाला आहे.
------------------------------------------------
रस्त्यावरील खड्ड्यामुळे पोलिस उपाआयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. त्याप्रमाणे यापुढे स्टेशन परिसरात कोणावरही हल्ला झाल्यास सिडको आणि महापालिका अधिकाऱ्यांवर दाखल करणे गरजेचे आहे.
-जयवंत महामुनी, माजी उपनगराध्यक्ष
--------------------------------------
रस्त्यावरील लाईट बंद असल्याने या परिसरात काळोख असतो. रात्री कामावरून येताना काळोखामुळे भीती वाटते. येथे फिरणारे चरसी, पाकीटमार, मोबाईल चोरांमुळे जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो.
-सुनिता वोकारा, महिला प्रवासी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97678 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..