अंधेरी लोकलच्या फेऱ्या वाढवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंधेरी लोकलच्या फेऱ्या वाढवा
अंधेरी लोकलच्या फेऱ्या वाढवा

अंधेरी लोकलच्या फेऱ्या वाढवा

sakal_logo
By

विरार, ता. २० (बातमीदार) : पश्चिम रेल्वेवरील अंधेरीला मेट्रो असल्याने लोकलमधील बहुतांश गर्दी अंधेरी कमी होते. त्यामुळे विरार अंधेरी लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात. सकाळच्या वेळी विरारहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल डब्यात मोठी गर्दी असते; तर सायंकाळच्या वेळी मुंबईहून विरारच्या दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये मोठी गर्दी असते. त्यातच एसी लोकल सुरू केल्याने दुसऱ्या वर्गातील डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात काही बदल करण्याच्या मागणीचे निवेदन वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, वसई-विरारच्या वतीने पश्चिम रेल्वे प्रशासनाला देण्यात आले आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की प्रवाशांकडून होणाऱ्या त्रासाबाबत तीन महिन्यांपासून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याला प्रतिसाद देत अनेक प्रवाशांनी प्रवासी संघटनेकडे या समस्या मांडल्या आहेत. त्यानुसार पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात काही आमूलाग्र बदल करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. या वेळी संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक, उपाध्यक्ष अनिल मोरे, सेक्रेटरी यशवंत जड्यार, सह सेक्रेटरी प्रभाकर चिबडे, कार्यकारिणी सदस्य पंकज कदम व सामाजिक कार्यकर्ते भरत पंडित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97686 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..