उल्हासनगरात निर्माल्य सफाई अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात निर्माल्य सफाई अभियान
उल्हासनगरात निर्माल्य सफाई अभियान

उल्हासनगरात निर्माल्य सफाई अभियान

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २० (वार्ताहर) ः महापालिका आणि अशोका फाऊंडेशनच्या पुढाकाराने रेल्वेस्थानकाजवळील गणेश विसर्जन घाट येथे निर्माल्य सफाई अभियान राबवण्यात आले. शहरात सध्या स्वच्छता अभियान सुरू आहे. त्या अंतर्गत ही सफाई करण्यात आली.

या अभियानात पालिकेचे आरोग्य उपआयुक्त डॉ. सुभाष जाधव, सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार, अशोका फाऊंडेशनचे शिवाजी रगडे, माजी नगरसेवक गजानन शेळके, समाजसेवक जमील खान, फिरोज खान, प्रमोद घनबहादुर, अखिलेश गुप्ता तसेच अशोका फाऊंडेशनचे सभासद सहभागी झाले होते. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रथमच इंडियन स्वच्छता लिग स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यात देशातील ९२ शहरांनी सहभाग घेतला आहे. यंदाच्या स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत अव्वल ठरण्यासाठी अनेक शहरांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यासाठी आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या देखरेखीखाली उल्हासनगरनेही कंबर कसली आहे.नागरिकांनी अभियानात उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा आणि अभियान यशस्वी करून उल्हासनगर स्पर्धेत अव्वल येण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन अशोका फाऊंडेशनचे शिवाजी रगडे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97701 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..