माणसाच्या उत्कर्षामध्ये संवाद महत्त्वपूर्ण - एकनाथ आव्हाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणसाच्या उत्कर्षामध्ये संवाद महत्त्वपूर्ण - एकनाथ आव्हाड
माणसाच्या उत्कर्षामध्ये संवाद महत्त्वपूर्ण - एकनाथ आव्हाड

माणसाच्या उत्कर्षामध्ये संवाद महत्त्वपूर्ण - एकनाथ आव्हाड

sakal_logo
By

विरार, ता. २० (बातमीदार) : माणसाच्या उत्कर्षामध्ये संवाद महत्त्वपूर्ण आहे. तसेच शैक्षणिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करताना संवादाला महत्त्वाचे स्थान आहे. खरा शिक्षक तोच, जो विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना कसे सामोरे जायचे शिकवतो. तो आणि तीच खरी शिक्षण प्रणाली आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी केले.
ते यंग स्टार्स ट्रस्टचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आयोजित केलेल्या शिक्षण संवाद मंचअंतर्गत पहिल्या वार्षिक शिक्षण परिषदेत बोलत होते. विरार पश्चिमेच्या जुन्या विवा महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. ‘शैक्षणिक उपक्रमातून शैक्षणिक समृद्धीकडे’ या उद्देशाने शिक्षण संवाद मंचाच्या या पहिल्या वार्षिक शिक्षण परिषदेत एकनाथ आव्हाड यांचे ‘आनंददायी शिक्षण’ या विषयावर बीजभाषण झाले. युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद झाली. या परिषदेला संजीव पाटील, संजय पिंगुळकर, उपप्राचार्या प्रा. प्राजक्ता परांजपे, प्रा. दीपा वर्मा माजी नगरसेवक हार्दिक राऊत आदी उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्राशी निगडित विद्यार्थी-पालक आणि शिक्षक यांना केंद्रबिंदू मानून विधायक शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यासाठी शिक्षण संवाद मंचचे निमंत्रक अजीव पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून या शिक्षण संवाद मंचची स्थापना करण्यात आली. यापुढे शिक्षण क्षेत्राशी निगडित विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना केंद्रबिंदू मानून त्यांना शैक्षणिक समृद्धीकडे घेऊन जाणारे उपक्रम या शिक्षण संवाद मंचच्या माध्यमातून घेण्यात येतील, असे प्रतिपादन या मंचाचे संयोजक कवी शिक्षक अमोल पाटील यांनी प्रास्ताविकातून केले; तर निसार तांबोळी यांनी मान्यवरांचे आभार मानले.
.....
बदल स्वीकारण्याची तयारी हवी
आजचे जग हे माहिती तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात टिकून राहण्यासाठी आणि समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी पर्यायाने व्यक्तीचा आणि समाजाचा विकास साध्य करण्यासाठी हे नवीन बदल स्वीकारले पाहिजेत. आपण वेळोवेळी अद्ययावत होत राहिले पाहिजे. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी ऑनलाईन अध्यापन केले. त्यामुळे मुले अभ्यासाशी निगडित राहिली हे माहिती तंत्रज्ञानामुळे शक्य झाले. येणाऱ्या काळात आपल्याला या नव्या बदलांनी भरलेले अद्ययावत असे विद्यार्थी आपण घडवले पाहिजेत. बदलत्या परिस्थितीतील नवी आव्हाने आणि त्याचा जनसामान्यावर होत असलेला परिणाम तसेच जनजीवनातील होत असलेले अद्ययावत तंत्रज्ञानामुळे नवीन बदल आता आपण स्वीकारण्यासाठी तयार राहिले पाहिजे आणि आपण आपल्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या अंगाने तयार करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार क्षितिज ठाकूर यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97708 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..