बदलापूरमध्ये तरुणांचा राष्ट्रवादीत प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदलापूरमध्ये तरुणांचा  राष्ट्रवादीत प्रवेश
बदलापूरमध्ये तरुणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

बदलापूरमध्ये तरुणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

sakal_logo
By

बदलापूर, ता. २० (बातमीदार) ः राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या समर्थनार्थ अनेक तरुणांनी सोमवारी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला त्यामुळे बदलापूर शहरात राष्ट्रवादीचा प्रभाव वाढत असल्याचे बोलले जात आहे.
सध्या घडणाऱ्या राजकीय पार्श्वभूमीवर नक्की कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घ्यायचा या विचारात सध्या तरुणाई आहे. बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा कॅप्टन आशिष दामले हे सांभाळत आहेत. त्यांनी अनेक तरुणांना पक्षात काम करण्यात संधी दिली आहे. सोमवारीही अनेक तरुणांनी त्यांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश केला. कॅप्टन आशिष दामले यांच्या सहकार्याने काम करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत, असे या कार्यकर्त्यांनी संगितले. तर, पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य या युवा पिढीकडून होईल याची खात्री आहे. शहरात पक्ष बळकट करण्यासाठी पक्ष वाढीचे काम सतत करणार असल्याचे या वेळी कॅप्टन आशिष दामले यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97718 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..