सलग दुसऱ्या सत्रात बाजाराची मुसंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सलग दुसऱ्या सत्रात बाजाराची मुसंडी
सलग दुसऱ्या सत्रात बाजाराची मुसंडी

सलग दुसऱ्या सत्रात बाजाराची मुसंडी

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : अमेरिकेसह आशियाई शेअर बाजारात खरेदीचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशी देशातील बाजारात दिसून आले. विदेशी गुंतवणुकीचा ओघ पुन्हा वाढल्याने साधारण एक टक्क्याची वाढ होत बाजार मंगळवारी (ता. २०) बंद झाला. जागतिक पातळीवर अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका रेपोदरात वाढ करत असतानाही बाजारात खरेदी झाली.

बीएसईचा सेन्सेक्स ५७८ अंशांसह ०.९८ टक्क्याने वधारत ५९,७१९ वर बंद झाला. मंगळवारच्या सत्रादरम्यान बाजाराने ६०,१०५ पर्यंत उसळी मारली होती. एनएसईचा निफ्टी १.१० टक्क्यासह १९४ अंशांनी मजबूत होत १७,८१६ वर स्थिरावला. सेन्सेक्समध्ये सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब, इन्डसइंड बँक, टाटा स्टील, टायटन, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, एशियन पेन्ट्‍स या कंपन्यांच्या समभागात तेजी; तर नेस्ले, पॉवरग्रीड, इन्फोसिस, रिलायन्स इन्डस्ट्रीज कंपनीच्या समभागात घसरण झाली.

पाश्‍चिमात्य बाजारातून कमजोर संकेत मिळूनही देशातील गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी सुरू आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचा भारतीय बाजारावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार नाही, असा अंदाज आहे. अनेक कंपन्यांचे समभाग खरेदीचा धडाका गुंतवणूकदारांनी लावला आहे. आयटी आणि औषध कंपन्यांच्या समभागांचे तिमाही निकाल समाधानकारक नसतानाही दीर्घ कालावधीसाठी खरेदी सुरू आहे. हा ट्रेन्ड कायम राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातही स्थिरता राहणे आवश्‍यक आहे, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख संशोधक विनोद नायर यांनी सांगितले.

बीएसईचा मिडकॅप निर्देशांक १.६५ टक्के; तर स्मॉलकॅप १.०१ टक्क्यांनी वधारला. आरोग्य सेवा (२.८१ टक्के), ग्राहकोपयोगी वस्तू (२.१७), वाहन (१.५९), धातू निर्देशांक १.३४ टक्क्यांनी मजबूत झाला.

आशियायी बाजारात सेऊल, टोकियो, शांघाय, हाँगकाँग या बाजारांत चांगलीच तेजी आली होती. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेन्ट क्रूड ऑईल ०.४९ टक्क्यांनी वधारत ९२.४५ डॉलर प्रतिबॅरलने मजबूत झाले. डॉलरच्या तुलनेत रुपया सात पैशांनी वधारत ७९.७४ वर स्थिरावला. बीएसईच्या आकडेवारीनुसार सोमवारी ३१२ कोटी रुपयांची विदेशी संस्थात्मक गुंतवणूक झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97720 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..