आईनेच केली तीन वर्षीय मुलीची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आईनेच केली तीन वर्षीय मुलीची हत्या
आईनेच केली तीन वर्षीय मुलीची हत्या

आईनेच केली तीन वर्षीय मुलीची हत्या

sakal_logo
By

जव्हार, ता. २० (बातमीदार) ः शहरात आईनेच आपल्या पोटच्या तीनवर्षीय तान्हुलीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. शहरातील बायपास रोडवर अचानक नगर येथे राहणारी अफसाना ऊर्फ तारा सुलेमानी (वय ३७) या महिलेने स्वतःच्या पोटची तान्हुली सना (वय ३) हिचा खून करून प्लास्टिकच्या पोत्यात कोंबून बाहेर फेकून दिले होते. तिने हे कृत्य सोमवारी दुपारी केल्याची कुबली दिली आहे.
तारा हिने सना ही सायंकाळी उरूसात कुठे तरी हरवली असल्याचा बनाव केला. परिसरातील नागरिकांनी मुलगी हरवल्याचे समजताच तिचा सर्वत्र शोध सुरू केला. काही वेळातच सनाचा मृतदेह हा सध्या राहत असलेल्या घराच्या समोर बेकरीच्या शेजारी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच जव्हार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी खाकीचा हिसका दाखवताच आरोपी अफसानाने हे कृत्य केल्याचे कबुल केले. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. या आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97725 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..