वेदांता प्रकल्पावरून राष्ट्रवादी आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेदांता प्रकल्पावरून राष्ट्रवादी आक्रमक
वेदांता प्रकल्पावरून राष्ट्रवादी आक्रमक

वेदांता प्रकल्पावरून राष्ट्रवादी आक्रमक

sakal_logo
By

तुर्भे, ता. २०(बातमीदार): वेदांता फॉक्सकॉन कंपनी गुजरातला गेल्यामुळे आक्रमक झालेल्या नवी मुंबईतील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारविरोधात मंगळवारी (ता.२०) कोकण भवन येथे निषेध आंदोलन केले. यावेळी या प्रकल्पामुळे दीड लाख तरुणांना रोजगार मिळणार होता. मात्र शिंदे-फडणवीस सरकारच्या दुर्लक्षामुळे महाराष्ट्राला या प्रकल्पापासून मुकावे लागल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
वेदांता-फॉक्सकॉन समूहाने सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर आता त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसने कोकण भवन समोर आंदोलन करत निदर्शने केली. यावेळी वेदांता व फॉक्सकोन प्रकल्प केंद्र शासनाने गुजरातला घेऊन जात महाराष्ट्रातील जनतेला धोका दिल्याच्या आरोप करत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करण्यात आला. तसेच पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे होणाऱ्या वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्पामुळे एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार होता. पण राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत यांनी केला. यावेळी आंदोलकांनी केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. तसेच शिंदे – फडणवीस सरकारवर सडकून टीकाही केली.
यावेळी आंदोलनात प्रभारी प्रशांत पाटील, सचिव रहमान सय्यद, युवक काँग्रेस अध्यक्ष किशोर आंग्रे, युवक कार्याध्यक्ष नितिन चव्हाण, पनवेल युवक अध्यक्ष प्रमोद बागल, ऐरोली विधासभा अध्यक्ष जतीन धनावडेसह शेकडो पदाधिकारी सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97726 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..