मिरा-भाईंदरमध्ये क्षयरोगाचे १,७४१ रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा-भाईंदरमध्ये क्षयरोगाचे १,७४१ रुग्ण
मिरा-भाईंदरमध्ये क्षयरोगाचे १,७४१ रुग्ण

मिरा-भाईंदरमध्ये क्षयरोगाचे १,७४१ रुग्ण

sakal_logo
By

भाईंदर, ता. २० (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात सध्या क्षयरोगाचे १,७४१ रुग्ण आहेत. या सर्वांवर उपचार सुरू आहेत; मात्र उपचारासोबतच क्षयरोगाच्या रुग्णांना पोषण आहार देणे बंधनकारक आहे आणि तो लोकसहभागातूनच द्यायचा आहे. त्यामुळे या पोषण आहाराच्या दात्यांचा महानगरपालिकेडून शोध सुरू आहे.
देश २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने अभियान सुरू केले असून त्याची सुरुवात राष्ट्रपतींच्या हस्ते अलीकडेच करण्यात आली. संसर्गजन्य आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये क्षयरोगाचे स्थान पहिल्या दहामध्ये आहे. परिणामी, देशांतील क्षयरोगाचे व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यात क्षयरोग रुग्णांना लोकसहभागातून द्यायचा पोषण आहार, आजाराच्या निदानासाठी मदत, व्यावसायिक मदत याचाही समावेश आहे. हा लोकसहभाग स्वयंसेवी संस्था, व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांच्याकडून घ्यायचा आहे. त्यांना निक्षय मित्र असे संबोधण्यात येते. मिरा-भाईंदर क्षेत्रात १,७४१ क्षयरोग रुग्ण आहेत. यापैकी काही जण खासगी उपचार घेत आहेत; तर काही जणांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून औषध उपचार केले जात आहेत. यापैकी सुमारे आठशे रुग्णांना लोकसहभागातून पोषण आहार मिळण्याची गरज आहे. आतापर्यंत महापालिका स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सुमारे साडेपाचशे रुग्णांसाठी निक्षय मित्र मिळवण्यात यशस्वी झाली आहे; मात्र उर्वरित रुग्णांसाठी निक्षय मित्रांचा शोध सुरू आहे.
क्षयरोगाच्या उपचारात पोषण आहाराचे खूप महत्त्व आहे. हा पोषण आहार काय आहे त्याचे तपशील महापालिकेकडून जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार एका रुग्णासाठी एका महिन्याचा खर्च पाचशे ते एक हजार रुपये इतका आहे. रुग्णांसाठी २०२५ पर्यंत म्हणजे तीन वर्षे निक्षय मित्र महापालिकेला मिळवायचे आहेत. पोषण आहाराव्यतिरिक्त ज्या क्षयरोग रुग्णांना बरे झाल्यानंतर रोजगाराची आवश्यकता आहे, त्यांना व्यावसायिक मदतीची तसेच आजाराचे निदान करण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे, अशा निक्षय मित्रांचीही आवश्यकता आहे. आतापर्यंत महाराष्ट्र जनविकास केंद्र (१०० रुग्ण), अवंता फाऊंडेशन (५० रुग्ण), खुशी फाऊंडेशन (५० रुग्ण), मेकिंग द डिफरन्स (५० रुग्ण), हेल्पिंग हँड फाऊंडेशन (१०० रुग्ण) या स्वयंसेवी संस्थांनी तसेच वैयक्तिक अशोक यादव (१० रुग्ण) तसेच सात ते आठ आजी-माजी लोकप्रतिनिधींनी निक्षय मित्र म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97731 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..