पालघरमध्ये १५४ विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरमध्ये १५४ विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे वाटप
पालघरमध्ये १५४ विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे वाटप

पालघरमध्ये १५४ विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे वाटप

sakal_logo
By

पालघर, ता. २० (बातमीदार) : सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातीहितवर्धक मंडळाच्या कामिनी व दत्तात्रय धर्माजी अधिकारी स्मरणार्थ विद्यार्थी आर्थिक मदत वितरण कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष संतोष पावडे यांच्या अध्यक्षतेखाली गोविंदराव दादोबा ठाकूर सभागृह पार पडला. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन उद्योजक गणेश पाटील यांनी केले. तर प्रमुख अतिथी म्हणून इन्फिनिटी इंजिनिअरिंग हाऊस ऑफ स्विच गीअर्स अँड ऑटोमेशनचे विशाल राऊत उपस्थित होते. गणेश पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मंडळ करीत असलेल्या मदतीची सतत जाणीव ठेवावी असे मत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे पत्रकार वैभव पाटील यांनी मार्गदर्शन करताना मुलांनी आपले ध्येय निश्चित करावे ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे, प्रयत्नात सातत्य असेल तर यश मिळणारच, असे सांगितले. यावेळी १५४ विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आली. यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष, समाजरत्न,समाजभूषण राजाराम पाटील ,समाज भूषण मार्तंड पाटील,विश्वस्त अशोक ठाकूर, विषणुकांत राऊळ,शरद पाटील,विजय पाटील,विवेक कोरे ,सल्लागार नागेश राऊळ,मार्तंड पाटील दिलीप राऊत ,नरेश कोरे तसेच मंडळाचे अनेक आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97735 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..