अंबरनाथला पोलिसांसाठी २५ मजली इमारत होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथला पोलिसांसाठी २५ मजली इमारत होणार
अंबरनाथला पोलिसांसाठी २५ मजली इमारत होणार

अंबरनाथला पोलिसांसाठी २५ मजली इमारत होणार

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २० (बातमीदार) ः अंबरनाथमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांसाठी दोन २५ मजली निवासी इमारती बांधण्यात येणार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी भेट घेऊन विशेष बाब अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.

अंबरनाथच्या पश्चिमेकडील मोडकळीस आलेल्या पोलिस कर्मचारी निवासी इमारतीच्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात यावी याकरिता आमदार डॉ. किणीकर पाठपुरावा करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार डॉ. किणीकर यांनी सोमवारी (ता.१९) भेट घेतली. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार डॉ.किणीकर यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने शासनस्तरावर तत्कालीन गृह राज्यमंत्री यांच्याकडे आयोजित बैठकीत पोलिसांच्या निवासी इमारती उभारण्यास परवानगी देण्यात आली होती. तसेच या इमारतींकरिता आवश्यक असलेले आराखडे व नकाशे देखील वास्तुविशारद, सल्लागाराकडून तयार करण्यात आले आहेत. परंतु, निधी उपलब्ध नसल्याने या इमारतींच्या कामाकरिता अडचणी निर्माण झाल्या होत्या. राज्य शासनाचे पोलिसांकरिता घरे या धोरणाच्या अनुषंगाने या इमारतीच्या बांधकामासाठी विशेष बाब म्हणून आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून दिल्यास बांधकाम पूर्ण होऊन सुसज्ज अशा इमारती तयार होतील असे आमदार डॉ. किणीकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे पोलिसांना सुसज्ज व योग्य सोयी सुविधा असलेली घरे उपलब्ध होऊ शकतील, असा विश्वास डॉ.किणीकर यांनी व्यक्त केला आहे.
----
अंबरनाथ पोलिस स्थानकानजीक असलेल्या पोलिसांची निवासी इमारत मोडकळीस आली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या निवासस्थानांच्या ठिकाणी टाईप दोनची प्रत्येक मजल्यावर आठ सदनिका असलेली २५ मजली इमारत साकारण्यात येईल.
- डॉ. बालाजी किणीकर, आमदार

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97744 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..