जिल्ह्यात लम्पीचा धोका वाढतोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात लम्पीचा धोका वाढतोय
जिल्ह्यात लम्पीचा धोका वाढतोय

जिल्ह्यात लम्पीचा धोका वाढतोय

sakal_logo
By

वसई, ता. २० (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात लम्पीचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून गुजरातहून येणाऱ्या जनावरांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. लम्पीबाबत पशुसंवनर्धन विभागाने सतर्कता बाळगली असली तरी तलासरी, वाडा, वसई आणि उमरोळीत जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून आल्याने धोका वाढत चालला आहे.
पालघर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वाडा येथे एका गाईमध्ये लम्पीची लक्षणे आढळून आली होती. त्यानंतर त्वरित परिसरातील एक हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले. त्याचबरोबर तपासणी केंद्रे उभारण्यात आली. तसेच महाराष्ट्र व गुजरात सीमेवर जिल्हा असल्याने सतर्कता बाळगत जनावरांची ने-आण करण्यास बंदी घालण्यात आली. विविध प्रशासकीय विभागाला जनावरांमध्ये लक्षणे आढळून आल्यास त्वरित पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. अशात तलासरी, वाडा, वसई, उमरोळी या ठिकाणी एकूण १० जनावरांना लम्पीची लक्षणे आढळल्याने पशुसंवर्धन विभागाने एकूण ७० हजार लसीचा साठा तयार ठेवला आहे. यापैकी ११,८५७ जनावरांचे लसीकरणदेखील करण्यात आले.
वसईत एका गोशाळेत दोन पशूंमध्ये लक्षणे आढळली, त्यामुळे येथील सर्व गाईंना लसीकरण केले गेले आहे. एकीकडे काही दिवसांपूर्वी एकाच पशूला लम्पी आजराने ग्रासले असताना जिल्ह्यात फैलाव वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत एकूण १० जनावरांमध्ये लम्पीची लक्षणे आढळली आहेत. यापैकी सात जनावरे सुस्थितीत आहेत; तर तीन जनावरांमध्ये सुधारणा होत असल्याचे पशुसंवर्धन सिभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
----------------------------------
व्हिडीओ कॉन्फरन्सने मार्गदर्शन
जिल्ह्यात जनावरांना लम्पीची लक्षणे दिसत असल्याने यावर प्रतिबंध घालता यावा व वेळीच उपाययोजना करण्यात यावी म्हणून मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पशुसंवर्धन अधिकारी, डॉक्टर, पालघर जिल्हाधिकारी विभागाचे अधिकारी व विविध यंत्रणेने सहभाग घेतला.
....
जनावरांना लम्पीची लागण होऊ नये म्हणून प्रत्यक्ष नागरिकांत जनजागृती करत आहोत. डहाणू व तलासरी येथे भेट दिली. राज्य शासनाकडेदेखील पाठपुरावा सुरू आहे. विक्रमगड व मोखाडा येथे जनावरांसाठी गेल्या दीड वर्षांपूर्वी दोन रुग्णवाहिका आणल्या आहेत, त्यामुळे याचा फायदा लम्पी आजाराप्रसंगी होत आहे. लम्पी लक्षणे आढळले तर त्वरित जनावरांची तपासणी करून घ्यावी.
- सुनील भुसारा, आमदार
-----------------------------
पाच ठिकाणी लम्पीची लक्षणे जनावरांना दिसून आली आहेत. या जनावरांचे नमुनेदेखील पुण्याला पाठवण्यात आले असून लसीकरणाचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. टप्प्याटप्याने लसीकरण करण्यात येत आहे; तर १० पैकी सात जनावरांमध्ये बऱ्यापैकी सुधारणा आहे. जिल्ह्यातील गोशाळांची तपासणी करण्यात येणार आहे.
- डॉ. पी. जी. चव्हाण, अधिकारी, पशुसंवर्धन विभाग, पालघर
-------------------------
लक्षणे असलेली जनावरे
वसई - २
डहाणू - १
तलासरी - १
वाडा - ३
उमरोळी - २
------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97747 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..