एका दिवसात सव्वा लाख जणांचा विमानप्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एका दिवसात सव्वा लाख जणांचा विमानप्रवास
एका दिवसात सव्वा लाख जणांचा विमानप्रवास

एका दिवसात सव्वा लाख जणांचा विमानप्रवास

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : जगातील सर्वांत व्यग्र सिंगल रनवे विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने एकाच दिवसात सव्वा लाख प्रवाशांची वाहतूक केल्याची नोंद झाली आहे. ही कोविड काळानंतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ झालेली सर्वाधिक वाहतूक प्रवाशांची नोंद आहे.
१७ सप्टेंबर २०२२ या दिवशी जवळपास १.३० लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली. एकूण प्रवाशांपैकी ९५,०८० प्रवाशांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ (T२) वरून प्रवास केला; तर ३५,२९४ प्रवाशांनी टर्मिनल १ (T१) वरून प्रवास केल्याची नोंद झाली. १७ सप्टेंबरला या एका दिवशी एकूण ८३९ उड्डाणांची नोंद झाली. या दिवशी मुंबई विमानतळावर इंडिगो, एअर इंडिया आणि एमिरेट्स या कंपन्यांनी सर्वाधिक उड्डाणे केली. शनिवारनंतर रविवारच्या गर्दीत फारसा फरक पडला नाही. १८ सप्टेंबरला मुंबई विमानतळावर १.३ लाखाहून अधिक प्रवाशांची नोंद झाली. ज्यापैकी अंदाजे ९८,००० प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास केला; तर ३२,००० प्रवाशांना आंतरराष्ट्रीय मार्गांवर देशाबाहेर प्रवास केला. इंडिगो विस्तारा आणि गो फर्स्ट या कंपन्यांनी देशांतर्गत मार्गांवर सर्वाधिक प्रवासी वाहतूक केली.
...
विमान वाहतूक वृद्धीच्या मार्गावर
रेटिंग एजन्सी इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी ऑफ इंडिया लिमिटेड (ICRA) च्या मते देशांतर्गत हवाई मार्गाने प्रवासी वाहतूक ऑगस्ट २०२२ मध्ये ५ टक्क्यांनी वाढून १.०२ कोटी प्रवासी एवढी झाली आहे. विमान वाहतूक उद्योग सामान्य स्थितीसह वृद्धीच्या मार्गावर आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन गंतव्यस्थाने, विमान उड्डाणांची वाढती संख्या आणि विमानसेवेच्या क्षमतेत झालेली वाढ यामुळे वाहतूक वाढली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97760 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..