चालत्या रिक्षात चाकूच्या धाकाने लूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चालत्या रिक्षात चाकूच्या धाकाने लूट
चालत्या रिक्षात चाकूच्या धाकाने लूट

चालत्या रिक्षात चाकूच्या धाकाने लूट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुंबईत कुरार पोलिसांनी रविवारी (ता. १८) रात्री मालाड पूर्व येथे दोन जणांना चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी एका ऑटोचालकासह चार जणांना अटक केली आहे. दरोड्याच्या काही तासांतच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. ऑटोचालक आकाश शिंदे आणि त्याचे साथीदार गणेश राजे, महेश कांबळे, सनी घोडे आणि राम राजे अशी आरोपींची नावे आहेत.
पीडित दीनबंधू दास आणि कलन दुलई हे दोघे मालाडमधील लक्ष्मणनगरमधील रेस्टॉरंटच्या बाहेर रिक्षा भाड्याने घेण्यासाठी थांबले होते. तेव्हा आरोपी रिक्षाचालक त्यांच्याजवळ पोहोचला. रिक्षात इतर आरोपी उपस्थित होते. रिक्षाचालकाने गंतव्यस्थानावर येण्याची विनंती केली. पीडित व्यक्ती आरोपी रिक्षाचालकाला ओळखत असल्याने त्यांनी प्रवास करण्यास मान्य केले. काही अंतरावर आरोपींपैकी एकाने चाकू काढला आणि पीडित व्यक्तीच्या गळ्याला लावत त्याच्याकडे असलेली सर्व रोकड काढून देण्यास सांगितले. मग दोघांना धावत्या रिक्षातून ढकलून दिले. दोन्ही पीडितांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. कुरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
...
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी
कुरार पोलिस पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला आणि काही तासांतच कुरारच्या विविध भागांतून आरोपींना पकडले. सर्व आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. तपासादरम्यान पोलिसांना कळले, की काही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांच्यावर कुरार आणि इतर पोलिस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97770 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..