मुंब्र्यात हत्या प्रकरणी १२ तासात आरोपी गजाआड ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंब्र्यात हत्या प्रकरणी १२ तासात आरोपी गजाआड !
मुंब्र्यात हत्या प्रकरणी १२ तासात आरोपी गजाआड !

मुंब्र्यात हत्या प्रकरणी १२ तासात आरोपी गजाआड !

sakal_logo
By

ठाणे, ता. २० वार्ताहर ः तीन वर्षांपूर्वी लहान भावाच्या झालेल्या खुनात सहभाग असल्याच्या संशयावरून हत्या करून मृतदेह झुडपात टाकल्याची घटना मुंब्रा परिसरात घडली. या घटनेतील आरोपी सानीफ आसु साही (वय २६) याला अवघ्या १२ तासांत मुंब्रा पोलिसांनी बेहरामपाडा मुंबई येथून अटक केली आहे. मृत मोहम्मद इत्तेहाद मोहम्मद अब्दुल वाहीद, (वय २०) रा. मालदा, पश्चिम बंगाल याचा मृतदेह मुंब्रा पोलिसांना सोमवारी सापडला. मृतक हा मजुरीची कामे करीत होता. मुंब्रा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली. पोलिस पथकाने तांत्रिक अभ्यास करीत थेट मुंबईच्या बेहराम पाड्यात पोहचले. त्यांनी आरोपी सानीफ आसू साही मूळचा कहला, पोस्ट- उत्तर लक्ष्मीपूर, जि. मालदा टाऊन, पश्चिम बंगाल याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्याने आपला सहकारी झकीर शेख याच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली. मुंब्रा पोलिसांनी त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवून अटक केली. आता हत्येतील दुसरा सहकारी आरोपी झाकीर शेख याचा शोध पोलिस घेत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97771 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..