पोलिसांच्या हातून निसटलेला आरोपी पुन्हा अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांच्या हातून निसटलेला आरोपी पुन्हा अटकेत
पोलिसांच्या हातून निसटलेला आरोपी पुन्हा अटकेत

पोलिसांच्या हातून निसटलेला आरोपी पुन्हा अटकेत

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला २५ वर्षीय आरोपी मंगळवारी (ता. २०) मुंबईतील न्यायालयाच्या आवारातून पोलिसांच्या हाती तुरी देत पळून गेला; परंतु पोलिसांना काही तासांतच त्याला पुन्हा अटक करण्यात यश आले आहे. मीराज फय्याज खान असे आरोपींचे नाव असून त्याला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. आरोपीला १९ सप्टेंबर सोमवारी रात्री नागपाडा येथील त्याच्या राहत्या घरातून वाहन चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपीला दोन हवालदारांसह शिवडी न्यायालयात रिमांडसाठी नेण्यात आले. तेव्हा तो पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र त्याला पुन्हा अटक करण्यात आली. आरोपीवर कोठडीतून पळून जाण्याचा आणखी एक गुन्हा दाखल केला जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97777 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..