त्या व्यायामशाळेचे बेकायदा बांधकाम वादात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्या व्यायामशाळेचे बेकायदा बांधकाम वादात
त्या व्यायामशाळेचे बेकायदा बांधकाम वादात

त्या व्यायामशाळेचे बेकायदा बांधकाम वादात

sakal_logo
By

ठाणे, ता. २० ः सावरकरनगर येथील शिव अभिमान व्यायाम शाळेत केलेले बेकायदा बांधकाम हे शिंदे गटाचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनीच केल्याचा आरोप शिवसेना विभागप्रमुख राजू शिरोडकर यांनी केला आहे. शिरोडकर यांनी कागदपत्रांसह पुरावे सादर करत शिव अभिमान व्यायाम शाळा बेकायदा बांधकाम प्रकरणात पहिल्या क्रमांकाचे प्रतिवादी असलेल्या दिलीप बारटक्के यांच्यावर एमआरटीपीची कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे.

सावरकरनगर येथील शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या शिव अभिमान व्यायाम शाळेचे भाडे थकल्याने ठाणे पालिकेने त्याला सील ठोकले; तर या व्यायामशाळेत बेकायदा बांधकाम झाल्याचा ठपका ठेवत राजू शिरोडकर यांच्यावर एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे; मात्र ते बेकायदा बांधकाम शिंदे गटाचे दिलीप बारटक्के यांनीच केल्याचा आरोप शिरोडकर यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी कोर्टाची कागदपत्रेच सादर केली आहेत. या व्यायामशाळेत जी बेकायदा खोली बनवली आहे, ती दिलीप बारटक्के यांनीच बनवली. तिथे ते ऑफिस थाटून बसले होते. हे प्रकरणही न्यायालयात गेले आहे. त्यादरम्यान ठाणे महापालिकेने त्या खोलीवर तोडक कारवाई केली. ती तोडफोड केलेली खोली तशीच आहे; मात्र तरीही त्यांना सोडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली विभागप्रमुखपदी नियुक्ती करताच आपल्यावर कारवाई करण्यात आली असल्याचा आरोपही शिरोडकर यांनी केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97778 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..