चेंबूर येथील चिखलमय रस्‍त्‍याने नागरिक त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चेंबूर येथील चिखलमय रस्‍त्‍याने नागरिक त्रस्त
चेंबूर येथील चिखलमय रस्‍त्‍याने नागरिक त्रस्त

चेंबूर येथील चिखलमय रस्‍त्‍याने नागरिक त्रस्त

sakal_logo
By

चेंबूर, ता. २१ (बातमीदार) ः चेंबूर येथील वाशीनाका परिसरातील वार्ड क्रमांक १४८ मधील गडकरी खाण, प्रयाग नगर, प्रकाश नगर मार्ग चिखलमय झाला आहे. नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. येथील रस्‍ता लवकर दुरुस्‍त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वाशीनाका परिसरात मोठी रासायनिक कंपनी आहेत. या कंपनीतून जड वाहने रासायनिक पदार्थांची वाहतूक करत असतात. यामुळे येथील रस्‍ते उखडले जात आहेत. याच परिसरात एमएमआरडीए वसाहत आहेत. या वसाहतीत मुंबईतील विविध भागांतील प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्‍यामुळे या परिसरात लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गडकरी खाण, प्रयाग नगर, प्रकाश नगर मार्गाची दुरवस्था होऊन हा मार्ग चिखलमय झालेला आहे. या चिखलमय मार्गावरून नागरिकांना ये–जा करावी लागत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. या मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97795 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..