बेकायदा रिक्षा थांब्यांचे पेव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा रिक्षा थांब्यांचे पेव
बेकायदा रिक्षा थांब्यांचे पेव

बेकायदा रिक्षा थांब्यांचे पेव

sakal_logo
By

तुर्भे, ता. २१ (बातमीदार) : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षा, टॅक्सी परवाने खुले केल्यामुळे शहरात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेकांनी नोकरी सांभाळून जोडधंदा म्हणून रिक्षा घेतल्या आहेत. मात्र, एकीकडे रिक्षांची संख्या वाढली असताना दुसरीकडे अधिकृत रिक्षा स्टॅण्ड कमी पडू लागल्याने काही राजकीय मंडळींनी स्वार्थासाठी शहरातील मोक्यांच्या जागांवर कब्जा केल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.
नवी मुंबई शहरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रिक्षा, टॅक्सीचे परवाने खुले करण्यात आले आहेत. यामुळे शहरात नवीन रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशातच सध्या शहरात १४७ ठिकाणी अधिकृत आणि तसेच संघटना, राजकीय पक्ष यांच्या माध्यमातून ३६ बेकायदा शेअर रिक्षा स्टॅण्ड सुरू आहेत. त्यात एमआयडीसी विभागासह रेल्वे, बस स्थानक, मार्केट, रहिवासी सोसायट्या, शाळा, महाविद्यालये यांचा समावेश असून अनेक ठिकाणी रिक्षांची तिहेरी पार्किंग केली जात असल्याने वाहतूक व्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत.
-----------------------------------------------
कारवाई करण्याची मागणी
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये रिक्षा व्यवसायाचा समावेश असून नवी मुंबई शहरात प्रवासी रिक्षा पर्यायाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. अशातच बेकायदा रिक्षा स्टॅण्डकडे दुर्लक्ष झाल्याने वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. शिवाय शहरात आरटीओ मान्यताप्राप्त अधिकृत थांब्यांची संख्या कमी असल्याने बेकायदा रिक्षा स्टॅण्डची संख्या वाढल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
--------------------------------------------------
रिक्षा स्टॅण्डला आमच्या विभागाकडून परवानगी दिली जाते; मात्र जे काही बेकायदा रिक्षा स्टॅण्ड उभे आहेत, त्यांच्यावर आरटीओ कारवाई करू शकत नाही. त्यावर महापालिका, पोलिस यांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.
- हेमांगिनी पाटील, आरटीओ अधिकारी, वाशी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97800 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..