किल्ले दुर्गाडी नवरात्र उत्सवावर शिंदे - ठाकरे गटाचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किल्ले दुर्गाडी नवरात्र उत्सवावर शिंदे - ठाकरे गटाचा दावा
किल्ले दुर्गाडी नवरात्र उत्सवावर शिंदे - ठाकरे गटाचा दावा

किल्ले दुर्गाडी नवरात्र उत्सवावर शिंदे - ठाकरे गटाचा दावा

sakal_logo
By

किल्ले दुर्गाडी नवरात्रोत्सवावर शिंदे-ठाकरे गटाचा दावा
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. २१ ः शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा, यावरून राज्यात शिंदे-ठाकरे गटात वाद सुरू असतानाच कल्याणमध्ये किल्ले दुर्गाडी नवरात्रोत्सवावरून शिंदे-ठाकरे गट एकमेकांसमोर भिडले आहेत. उत्सव आम्हीच साजरा करणार, असा दावा दोन्ही गटांनी केला आहे. जिल्हा प्रशासनाकडे हा प्रस्ताव गेला असून आता जिल्हाधिकारी कोणाला परवानगी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कल्याण येथील किल्ले दुर्गाडीवर १९६८ साली पूजा करण्यासाठी बंदी हुकूम जारी करण्यात आला होता. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सपत्निक बंदी हुकूम मोडून देवीची पूजा बांधली होती. तेव्हापासून आतापर्यंत ५४ वर्षांपासून दरवर्षी शिवसेनेकडून दुर्गाडीवर दुर्गाडी देवीचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. दुर्गाडी देवीच्या नवरात्रोत्सवाचा अध्यक्ष हा शिवसेनेचा शहर प्रमुख असतो. यंदा राज्यात शिवसेनेत दुफळी निर्माण झाली असून शिंदे व ठाकरे गटात सेना विभागली गेली आहे. दसरा मेळाव्यावरून राज्यात शिंदे व ठाकरे गटात वाद सुरू आहे. दुसरीकडे कल्याणमध्ये दुर्गाडी देवीचा उत्सव साजरा करण्यावरून शिंदे-ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे यांनी याविषयी सांगितले, ‘‘यासंबंधी पोलिस प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे. हा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती आम्हाला पोलिसांनी दिली आहे. परवानगी मिळताच दुर्गाडी येथे उत्सव साजरा केला जाईल.’’ तर दुसरीकडे शिंदे गटाचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी किल्ले दुर्गाडीवर नवरात्रोत्सव साजरा करण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली आहे. आम्हाला परवानगी मिळणार आणि आम्हीच दुर्गाडीवर उत्सव साजरा करणार, असा दावा भोईर यांनी केला आहे.
यामुळे नवरात्रोत्सव साजरा करण्याच्या परवानगीवरून शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. शिंदे गटाला समर्थन देणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी नवरात्रोत्सवानिमित्त किल्ले दुर्गाडी परिसरात स्वच्छता करण्याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97809 Txt Thane Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..