चिरले-दास्तान फाट्यावर अपघाताचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिरले-दास्तान फाट्यावर अपघाताचा धोका
चिरले-दास्तान फाट्यावर अपघाताचा धोका

चिरले-दास्तान फाट्यावर अपघाताचा धोका

sakal_logo
By

उरण, ता. २२ (वार्ताहर) : तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या दास्तानफाटा मार्गावर जोरदार पाऊस आणि अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. मोठ-मोठे खड्डे निर्माण होऊन रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या खड्ड्यांमुळे रस्ते धोकादायक बनले असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधून केला जात आहे.

जेएनपीए बंदराच्या अनुषंगाने आयात - निर्यातीसाठी तालुक्यातील अनेक गावांत मोठमोठी गोदामे, एमटी यार्ड उभारले आहेत. त्यामुळे या गोदामात येणाऱ्या मालाचे अवजड कंटेनर, ट्रेलरच्या वाहतुकीमुळेच रस्ता खराब होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ठेकेदारामार्फत उन्हाळ्यात चिरले येथील रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्या पावसातच खड्डे पडायला सुरुवात झाली. त्यात पाणी साचून रस्ता आणखी खराब होऊन मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून प्रवास कसा करायचा, असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. छोट्या वाहनांसाठी हा रस्ता अधिक धोकादायक बनला आहे. शासन स्तरावर या मार्गाची दखल घेऊन रस्ता नव्याने बनवून मजबुतीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

चिखलाचा राडा
चिरले ते दास्तान दरम्यान रेल्वेच्या पुलाचे काम सुरू आहे. रस्त्यावर माती पसरलेली असते. त्यातच पावसाची संततधार सुरू असल्याने रस्त्यावर चिखलाचा राडा निर्माण झाला आहे. अवजड वाहतुकीमुळे तर रस्ताच शिल्लक राहिला नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

जोरदार पाऊस पडत असल्याने रस्त्याची दुरुस्ती करता येत नाही. पाऊस थांबल्यावर रस्त्याचे काम मार्गी लावले जाईल.
- नरेश पवार, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97811 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..