मिसेस इंडिया हेरिटेज स्पर्धेत अलका सपकाळे उपविजेत्‍या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिसेस इंडिया हेरिटेज स्पर्धेत अलका सपकाळे उपविजेत्‍या
मिसेस इंडिया हेरिटेज स्पर्धेत अलका सपकाळे उपविजेत्‍या

मिसेस इंडिया हेरिटेज स्पर्धेत अलका सपकाळे उपविजेत्‍या

sakal_logo
By

शिवडी, ता. २१ (बातमीदार) ः देशातील ऐतिहासिक पर्यटनस्थळांचा सांस्कृतिक वारसा इतरांना माहिती व्हावा, यासाठी मिस आणि मिसेस हेरिटेज इंडिया स्पर्धेचे आयोजन पुणे येथे शुक्रवारी (ता. १६) करण्यात आले होते. यामध्‍ये मुंबईमधील काळाचौकी अभ्युदय नगर येथील अलका माधव सपकाळे यांनी सहभागी होऊन मुंबईतील ऐतिहासिक वास्तू गेटवे ऑफ इंडियाची माहिती सादर केली. त्‍यांनी या स्‍पर्धेत फर्स्ट रनर अप (उपविजेती) म्हणून बाजी मारली. यंदा स्पर्धेचे दुसरे वर्ष होते. या स्पर्धेत भारतातून अनेक महिलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे आयोजन मृणाल गायकवाड इंटरटेनमेंट यांनी केले होते. या स्पर्धेत पाहुणे म्हणून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सिने दिग्दर्शक अभिजीत पानसे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97814 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..