उल्हासनगरात कार बाजार, गॅरेजवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात कार बाजार, गॅरेजवर कारवाई
उल्हासनगरात कार बाजार, गॅरेजवर कारवाई

उल्हासनगरात कार बाजार, गॅरेजवर कारवाई

sakal_logo
By

उल्हासनगरात कार बाजार, गॅरेजवर कारवाई
२० हजार रुपयांचा दंड वसूल

उल्हासनगर, ता. २० (वार्ताहर) ः वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या किंबहुना वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या महामार्गावरील कार बाजार, गॅरेज चालकांवर उल्हासनगर महानगरपालिकेने धडक कारवाई केली. या कारवाईत २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कल्याण-अंबरनाथ हा महामार्ग उल्हासनगरातून जातो. या महामार्गावर असंख्य कार बाजार आणि गॅरेज आहेत. गॅरेजमालक त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी आलेल्या गाड्या या रस्त्यावरच उभ्या करत असतात. त्यांना पालिका वारंवार समज देते; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने मंगळवारी (ता. २०) आयुक्त अजीज शेख यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त गणेश शिंपी, तुषार सोनवणे यांनी कार बाजार, गॅरेजवर कारवाई केली.

फोटो
उल्हासनगर ः महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथील कार बाजार व गॅरेजवर कारवाई केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97817 Txt Thane Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..