जव्हार येथे ‘बायफ’तर्फे शेतकरी मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जव्हार येथे ‘बायफ’तर्फे शेतकरी मेळावा
जव्हार येथे ‘बायफ’तर्फे शेतकरी मेळावा

जव्हार येथे ‘बायफ’तर्फे शेतकरी मेळावा

sakal_logo
By

जव्हार येथे ‘बायफ’तर्फे शेतकरी मेळावा

जव्हार, ता. २१ (बातमीदार) : जव्हार येथे एकात्मिक आदिवासी विकास विभाग नाशिक आणि बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड व डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला १८५ शेतकरी उपस्थित होते.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार, डहाणू आणि बायफ यांच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांचे कृषी, फळबाग व भाजीपाला लागवडीतून उत्पन्न दुप्पट करणे तसेच प्रकल्पाच्या माध्यमातून वनपट्ट्यातील ९६५ शेतकऱ्यांसाठी भाजीपाला लागवड, चतुःसूत्री भात लागवड, प्रशिक्षण व अभ्यासदौरा असे विविध उपक्रम पार पडले. डहाणूच्या प्रकल्प अधिकारी असिमा मित्तल व जव्हारच्या प्रकल्प अधिकारी आयुषी सिंग, सहायक प्रकल्प अधिकारी विजय मोरे व इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे.
या शेतकरी मेळाव्यात विविध शासकीय योजना व शेतकरी उत्पादक कंपनीच्या एकत्रित भाजीपाला विक्री याची माहिती देण्यात आली. तसेच वनपट्टा क्षेत्रात प्रकल्प राबवित असताना येणाऱ्या अडचणींविषयी चर्चा करण्यात आली. मेळाव्याला कृषी विभाग जव्हार येथून सुनील महाला आत्मा, तालुकाप्रमुख तसेच बायफ विभागीय प्रमुख रितीराज सिंग, प्रकल्प प्रमुख विनोद बोरसे, संतोष आगळे व प्रकल्प समन्वयक यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज परदेशी यांनी; तर नितीन भोये यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

फोटो
जव्हार ः शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97820 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..