Mumbai: चाकूच्या धाकाने लूटमार करणाऱ्या आरोपी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news
चाकूच्या धाकाने लूटमार

Mumbai: चाकूच्या धाकाने लूटमार करणाऱ्या आरोपी अटकेत

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २१ (बातमीदार) ः मुंबईसह विविध ठिकाणी चाकूच्या धाकाने रोकड, तसेच वाहने लुटणाऱ्या आरोपीला पंतनगर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत अटक केली आहे. रिजवान शफी शेख असे आरोपीचे नाव असून तो वांद्रे येथील रंगशारदा लालमट्टी भागात राहतो.
मोहम्मद अकलक मोहम्मद सजन या फिर्यादीने दिलेल्‍या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली.

फिर्यादी हे रिक्षा ड्रायव्हर आहेत. ते १९ सप्टेंबर रोजी घाटकोपर पूर्वेकडील रेल्वे पोलिस वसाहत आणि रमाबाई आंबेडकर नगर दरम्यानच्या हायवे सुविधा शौचालय परिसरात असताना चाकूच्या धाकाने त्याच्याकडील रिक्षा, मोबाईल आणि अडीच हजार रुपयांची रोकड पळविला होती. त्‍यांनी त्याच दिवशी पंतनगर पोलिसांत तक्रार दाखल केली.

त्यानंतर परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रविदत्त सावंत यांनी पोलिसांना सूचना देऊन आरोपीचा शोध घेण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याच दिवशी सायंकाळी आरोपीला अटक केली. पोलिस उपनिरीक्षक पानसरे, निरीक्षक कोकरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण खरात तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97822 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimeMumbai