तीन मीटर बॉक्स जळून खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन मीटर बॉक्स जळून खाक
तीन मीटर बॉक्स जळून खाक

तीन मीटर बॉक्स जळून खाक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : लोकमान्यनगर येथील नाग दर्शन या इमारतीत आग लागून १० मीटर बॉक्स जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी मुक्ताई नगर, गोल्डन डाईज नाका येथील गोल्डन पार्क डी विंग या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या मीटर बॉक्स रूममध्ये आग लागली. यामध्ये तीन मीटर बॉक्स जळून खाक झाले असून कोणालाही दुखापत झालेली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी महावितरणचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97847 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..