लक्ष्मण डगळे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्ष्मण डगळे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश
लक्ष्मण डगळे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

लक्ष्मण डगळे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

sakal_logo
By

लक्ष्मण डगळे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

शहापूर, ता. २१ (बातमीदार) ः शहापूर तालुक्यातील कसारा येथील लक्ष्मण डगळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शहापूर येथे जाहीर प्रवेश केला. ठाणे जिल्ह्यात प्रमुख मानली जाणारी मोखावणा कसारा ग्रामपंचायत येथील भाजपाचे लक्ष्मण डगळे यांनी बुधवारी (ता. २१) त्यांच्या कार्यकर्त्यांसह शहापूरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. कसारा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते काशिनाथ पोकळा, विश्वास शिंदे त्यांच्या पुढाकाराने हा प्रवेश करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे, तालुका अध्यक्ष मनोज विषे, तालुका सरचिटणीस साजिद शेख, महिला तालुकाध्यक्ष रंजीता दुपारे, युवानेते श्रेयस वेखंडे, जयश्री कोरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला. या प्रवेशामुळे लक्ष्मण डगळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच पदाचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला या निवडणुकीत तालुक्यात चांगले यश मिळेल, अशी चर्चा आहे.

फोटो
शहापूर ः राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेले कार्यकर्ते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97867 Txt Thane Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..