आमगाव पुलावरील धोकादायक खड्डे बुजवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमगाव पुलावरील धोकादायक खड्डे बुजवले
आमगाव पुलावरील धोकादायक खड्डे बुजवले

आमगाव पुलावरील धोकादायक खड्डे बुजवले

sakal_logo
By

कासा, ता. २१ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तलासरीजवळ आमगाव पुलावर दोन दिवसांत पाच जणांचा अपघाती मृत्यू झाला. त्याला कारणीभूत असणारे तेथील खड्डे बुधवारी (ता.२१) महामार्ग पोलिस व महामार्ग प्रशासन यांनी बुजवले.

महामार्गांवर सध्या सतत अपघात होत असून यांचे कारण म्हणजे पडलेले खड्डे. सततच्या पावसामुळे खड्डे बुजवण्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. यामुळे अपघाताचे सत्र सुरूच आहे. सायरस मेस्त्री यांच्या अपघाताने जिल्हा प्रशासन जागे झाले. अनेक वेळा महामार्गावरील उड्डाण पूल, नादुरुस्त सेवा रस्ते, अरुंद पूल, सूचनाफलकांची कमतरता, टोलवरील अनियमितपणा यांची पाहणी झाली. दोन-चार दिवसांत उपाययोजनेला सुरुवात होईल, अशी आश्वसने देण्यात आली. काँग्रेस पक्षाने टोल नाका बंद केला; पण तरीही खड्डे भरणी व इतर कामांना गती नाही. त्यामुळे अपघातसत्र सुरूच आहे. शेवटी दापचरी जकात नाका येथे पडलेले खड्डे, आमगाव अपघाती पुलावरील खड्डे, धानीवरी पुलावरील खड्डे बुजवण्यासाठी चारोटी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक ए. एस. डोंगरे व पोलिस कर्मचारी स्वतः व महामार्ग रस्ता दुरुस्ती ठेकेदाराचे कर्मचारी हे खड्डे भरण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97871 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..